आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीर्ती गोल्डचे उत्पादन बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- कारखान्यातून प्रदूषित पाणी सोडल्याच्या कारणावरून येथील एमआयडीसी भागात असलेल्या कीर्ती गोल्ड व कीर्ती सॉलवेक्स या दोन कंपन्यांचे उत्पादन बंद करण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कारवाई केली आहे.

येथील एमआयडीसीत कीर्ती गोल्ड व कीर्ती सॉलवेक्स या नावाचे तेल उद्योग आहेत. कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याबाबत कारखानदार गंभीर नव्हते. हे पाणी एमआयडीसीच्या नाल्यात सोडले जात असे. त्यामुळे वरवंटी, नांदगाव आदी परिसरातील पशुधनास धोका निर्माण झाला होता. त्याबाबत मंडळाकडे नागरिकांनी तक्रारीही केल्या होत्या.
सांडपाणी संनियंत्रित
करावे याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित उद्योगांना वारंवार कळवले होते. जून महिन्यात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. सुधारणेबाबत वेळोवेळी सूचनाही केल्या होत्या. असे असतानाही उद्योजकाने मंडळाच्या सूचनेकडे कानाडोळा केला. यामुळे ३ जुलैला कारवाईबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला व ८ जुलै रोजी हे दोन्हीही उद्योगांचे सांडपाणी प्रक्रिया संनियंत्रित नसल्याने उत्पादन बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढले.

अधिवेशनातील तारांकितपूर्वीच झाली कारवाई
या प्रश्नावर आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी विधिमंडळ अधिवेशनात १४ जुलै रोजी तारांकित प्रश्न केला होता. त्याबाबत आमच्या कार्यालयाला कळवले होते. तथापि, त्यापूर्वीच आम्ही संबंधित उद्योगाचे उत्पादन बंद करण्यासाठी कारवाई केली होती. उद्योजकांनी सांडपाणी संनियंत्रण निकषाप्रमाणे केल्यास त्याची तपासणी केली जाईल. संनियंत्रण योग्य असल्यास पुन्हा या उद्योगांना उत्पादन सुरू करण्याची परवानगी देण्यात येईल.
-सतीश पडवळ, उपप्रादेशिक अधिकारी
बातम्या आणखी आहेत...