आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवान हृदयनाथ मानेंना गेवराईत भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई - झाशी येथे अपघातात मृत्यू झालेले गेवराई येथील जवान हृदयनाथ बाबूराव माने (३५) यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी बारा वाजता येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. "हृदयनाथ माने अमर रहे'च्या घोषणांनी गेवराईत वातावरण भावुक झाले होते.
फोटो - जवान मानेंच्या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी होते. छाया: वैजनाथ जाधव

माने यांचे पार्थिव शनिवारी रात्री मध्य प्रदेश येथून उशिरा विमानाने औरंगाबादेत आणण्यात आले.ते औरंगाबाद छावणी येथील मिलिटरी एरियामध्ये ठेवण्यात आले होते. औरंगाबाद येथून ते विशेष सैन्यदलाच्या ताफ्यासह गेवराईतील त्यांच्या राहत्या घरी जायकवाडी वसाहतीत रविवारी सकाळी आणण्यात आले. जायकवाडी वसाहतीपासून शास्त्री चौकमार्गे चिंतेश्वर स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली.