आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुणाचलमध्ये शहीद झालेल्या वझरच्या जवानावर सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - सेनगाव तालुक्यातील वझर येथील बालाजी पांडुरंग चोरमारे हा २४ वर्षीय भारतीय सैन्यातील जवान अरुणाचल प्रदेशात शहीद झाला होता. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास सैनिकी इतमामात त्यांच्या गावी वझर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. परिसरातील सुमारे २ हजार ग्रामस्थांनी त्यांना अखेरचा निरोप देऊन बालाजी अमर रहेच्या घोषणा दिल्या.

बालाजी चोरमारे हा २ वर्षांपूर्वी महार बटालियनमध्ये रुजू झाला होता. प्रशिक्षणानंतर सहा महिन्यांपूर्वीच त्याला महार बटालियन युनिट-३ मध्ये पद स्थापना मिळून तो अरुणाचल प्रदेशात कार्यरत झाला. १६ ऑक्टोबर रोजी कर्तव्य बजावत असताना बालाजी प्रवास करीत असलेल्या सैनिकी वाहनावर मोठी दरड कोसळली आणि त्याखाली दबला जाऊन तो शहीद झाला. अविवाहित असलेला सैनिक बालाजी चोरमारे सहा महिन्यांपूर्वी गावात येऊन गेला होता. दरम्यान, बालाजीचे पार्थिव सैनिकांनी विशेष वाहनाने बुधवारी गावात आणले आणि नातेवाइकांनी एकच टाहो फोडला. त्यानंतर सैनिकांनी त्याचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी नेण्यात आले. बुद्धवंदना झाल्यावर सैनिकांनी त्याच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले आणि नंतर १० सैनिकांनी ३ वेळेस अशा ३० फैरी झाडून बालाजीला सलामी दिली. त्यानंतर बालाजीच्या मोठ्या भावाने अग्निडाग दिला आणि पुढील विधी पूर्ण झाले. बालाजीच्या पश्चात आईसह चार भाऊ आणि दोन बहिणी आहेत.
बातम्या आणखी आहेत...