आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरसह कळंब, अंबाजोगाईचा पाणीपुरवठा होऊ शकतो खंडित; पाटबंधारे विभागाचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- लातूर पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या मांजरा धरणावरून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या लातूर, कळंब, अंबाजोगाई, धारूर या शहरांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटिसा पाठवूनही पाणीपट्टीची रक्कम पाटबंधारे विभागाला अदा केलेली नाही. त्यामुळे या शहरांचा पाणीपुरवठा कोणत्याही क्षणी बंद करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागू शकते.  

लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक या विभागात मांजरा, तावरजा हे दोन मोठे प्रकल्प आणि इतर काही मध्यम प्रकल्पांची जबाबदारी आहे. या प्रकल्पांमधून लातूर, अंबाजोगाई, कळंब, धारूर, केज या मोठ्या शहरांसह लहान खेड्यांनाही पाणीपुरवठा केला जातो.  जानेवारी अखेर प्रकल्पांतून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती आणि लातूर औद्योगिक वसाहतीकडे तब्बल २५ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे. 

यापूर्वी सर्वच संस्थांना पंधरा दिवसांची नोटीस देऊन रक्कम भरण्यास सांगण्यात  आले होते. मात्र संबंधित संस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लातूरच्या पाटबंधारे विभागाने सिंचन कायदा १९७६ मधील तरतुदींनुसार सर्वच योजनांचा पाणीपुरवठा खंडित करणार असल्याचे जाहीर केले आहे.

निम्न तेरणा प्रकल्प  
>बावीस खेडी योजना उमरगा १० लाख ७४ हजार  
>दहा खेडी मातोळा योजना १४ लाख ९५ हजार  
>तीस खेडी योजना औसा ६५ लाख ९७ हजार  

मांजरा प्रकल्प  
-लातूर महानगरपालिका  १६ कोटी ३६ लाख  
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण लातूर २ कोटी ११ लाख  
- अंबाजोगाई नगर परिषद ३ कोटी ५२ लाख  
- लातूर एमआयडीसी १ कोटी ४३ लाख  
- कळंब नगर परिषद ३४ लाख ९३ हजार  
- केज, धारूर १२ गावे योजना  ५ लाख ४९ हजार  
- आदींसह इतर लहान-मोठ्या गावांचा पाणीपुरवठा खंडित होऊ शकतो.  
बातम्या आणखी आहेत...