आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीमध्ये दारू दुकान बंदसाठी नगरसेवकासह 5 जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दारमबंदीसाठी घोषणाबाजी करत अंगावर रॉकेल आतून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिस रोखले. - Divya Marathi
दारमबंदीसाठी घोषणाबाजी करत अंगावर रॉकेल आतून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिस रोखले.
परभणी   - कारेगाव रस्त्यावरील जिल्हा उद्योग केंद्रासमोरील दारू दुकानाविरोधात शनिवारी (दि.१५) नगरसेवकांसह युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. दोन नगरसेवकांसह अन्य तीन युवकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडत युवकांना ताब्यात घेतले.   हे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी  शहरातील प्रभाग चार व पाचमधील नगरसेवकांनी मागील आठ दिवसांपासून जोरदार आंदोलन सुरू केले आहे. शिवसेनेनेही या आंदोलनात उडी घेत एक दिवस दुकान बंद करीत तोडफोड केली. त्यानंतर या दुकानाचे गेटचे काम सुरू असल्यामुळे या प्रभागातील नगरसेवकांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.    
 
शनिवारी सकाळी संतप्त नगरसेवक व नागरिकांचा जत्था जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्या ठिकाणी विशाल बुधवंत, बाळासाहेब देशमुख, नगरसेवक चंदू शिंदे, नगरसेवक प्रशासन ठाकूर, रितेश जैन, अक्षय देशमुख यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. परंतु पोलिसांनी प्रसंगावधान ठेऊन रॉकेल डब्बे व आगपेटी ओढून घेतली.
 
दारू दुकान परिसरात मुलींची शाळा, शासकीय कार्यालये, न्यायाधीशांची निवासस्थाने आदींचा विचार करून या दुकानाचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केली. त्यावर जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रभाग चार व पाचमध्ये कुठेही दारूचे दुकान नसावे, असा ठराव घ्यावा, त्यास आपण मान्यता देऊ, असे आश्वासन दिले.
 
दारुबंदीसाठी जोरदार घोषणा 
या वेळी  युवकांनी दारुबंदी साठी जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांच्या दालनामध्ये प्रेरणा वरपुडकर, नगरसेविका माधुरी बुधवंत, वनमाला देशमुख, उषा झांबड- जैन, नगरसेवक चंदू शिंदे, प्रशास ठाकूर, विशाल बुधवंत, बाळासाहेब देशमुख, रितेश जैन, सभापती महमूद खान,अक्षय देशमुख, अल्ताफ, शकील ऊर्फ बशीर आदी लोकांनी अधिकाऱ्यांसमोर   या दारू दुकानावर तीव्र आक्षेप नोंदवला. 
बातम्या आणखी आहेत...