आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा दावा; अर्ज आले 44 लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ जाहीर केली. यातून राज्यातील सुमारे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा काेरा हाेणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला अाहे. मात्र अाॅगस्टअखेरपर्यंत राज्यभरात ४४ लाख ६१ हजार ७६८ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी रजिस्ट्रेशन केले असून यात मराठवाड्यातून १३ लाख ३७ हजार ८१९ शेतकऱ्यांनी अाॅनलाइन रजिस्ट्रेशन केले अाहे. अाॅनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही १५ सप्टेंबर २०१७ अशी  असून किती प्रमाणात शेतकरी अर्ज भरतील याकडे लक्ष लागले अाहे.  

बीड जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून दुष्काळी स्थिती निर्माण झाली हाेती. त्याचप्रमाणे मराठवाड्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांवर अार्थिक, नैसर्गिक संकट अाेढवले हाेते. त्यामुळे शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करू शकले नाहीत. शेतकऱ्यांच्या वाढत्या अात्महत्या राेखण्याचे अाव्हान सरकारपुढे हाेते. तसेच २०१३-१४  व २०१४-१५  या वर्षात राज्यातील दुष्काळ आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठै नुकसान झाले होते. त्यामुळे कर्जमाफीसााठी आंदोलने झाल्याने अखेर कर्जमाफी जाहीर झाली.  राज्यातील सुमारे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा हाेईल, असा दावा सरकारने केला. मात्र अाॅगस्टअखेरपर्यंत राज्यभरातील ४४ लाख ६१ हजार ५४४  शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले असून अजूनही नोंदणी सुरूच आहे.  त्यामुळे प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांचा सातबारा काेरा हाेईल याकडे लक्ष लागले अाहे.  

जिल्हा बँकेकडून जागृती  
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ५९ शाखेमधील ११८ शाखा अधिकारी व इनिसपॅक्टर यांच्यामार्फत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अाॅनलाइन अर्ज करण्यासाठी प्रशिक्षित करत अाहेत. त्यासाठीचे कागदपत्र व अन्य तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करत अाहेत.  
- अादित्य सारडा, अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक. 
 
सहकार खात्याकडून प्रयत्न  
शासनाच्या अपले सरकार, महा-ई सेवा अाणि काॅमन सर्व्हिस सेंटर या ठिकाणावरून शेतकऱ्यांना अाॅनलाइन कर्जमाफीसाठी अर्ज करण्याच्या सुविधा उपलब्ध अाहेत. दरम्यान, लिंक न येणे, बँकेचा, गावाचा  समावेश नसणे यासह तांत्रिक अडचणी साेडवल्या जात अाहेत.  
- बी. डी. फलके, सहायक निबंधक  
बातम्या आणखी आहेत...