आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील कर्जमाफी याेजना फसवी , ज्येष्ठ शेतकरी नेते शंकरराव धाेंडगे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड-महाराष्ट्रात अच्छे दिन अाणू असे म्हणून सत्तेवर अालेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे मंत्री कुठेही काेणत्याही कार्यक्रमांमधून शेतकऱ्यांना फसवी अाश्वासने देत अाहेत. यातच कर्जमाफी याेजनांमधून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली अाहे, असा अाराेप  किसान मंच कार्यकारी समितीचे प्रमुख व ज्येष्ठ शेतकरी नेते माजी अामदार शंकर धाेंडगे यांनी केला.
   
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी किसान मंचाच्या वतीने ‘शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान’ व ५ सप्टेंबर रोजी नाशिक येथे शेतकरी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने बीड येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. धोंडगे यांनी या वेळी सरकारच्या धोरणावर टीका केली.  ते म्हणाले  शेतकरी, शेतमजुरांची व शेतीपूरक व्यावसायिकांची कोणत्याही अटी व निकष न लावता सन २०१७ पर्यंतच्या संपूर्ण कर्जातून मुक्तता करण्यात यावी राज्यातील शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी लावून धरणे आवश्यक आहे. यासाठी जुन्या व नव्या नेत्यांनी एकजुटीने पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षाही धोंडगे यांनी व्यक्त केली. 
बातम्या आणखी आहेत...