आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर समाजाने मते दिली असती तर केंद्रात मंत्री झालो असतो, जानकरांचे धक्कादायक वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - धनगर समाज आणि आरक्षणामुळे आपण मंत्री झालो नाही. बारामती लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाने मला मते दिली असती तर मी केंद्रात मंत्री झालो असतो, असे धक्कादायक वक्तव्य पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. दुसरीकडे मात्र धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यास आपण कटिबद्ध आहोत, असा विश्वासदेखील त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.     

जानकर एका खासगी कार्यक्रमासाठी शनिवारी येथे आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  जानकर म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण देण्यात अनेक कायदेशीर अडचणी येत आहेत. त्या पूर्ण करून धनगर समाजाला आरक्षण देण्यास मी कटिबद्ध आहे. मात्र, याच वेळेस धनगर समाजाचा मंत्री म्हणून मला जखडून ठेवू नका, असे म्हणत त्यांनी धनगर समाजावर टीका केली. मी धनगर समाजामुळे, आरक्षणाच्या मागणीमुळे मंत्री झालो नाही. बारामती लोकसभा निवडणुकीत मला ब्राह्मण, मराठा बांधवांनीदेखील मते दिली. मात्र, धनगर समाजाने मते दिली नाहीत. धनगर समाजाने मते दिली असती तर मी केंद्रात मंत्री झालो असतो, असे वादग्रस्त वक्तव्य जानकर यांनी केले.    
 
धनगर समाजाला आरक्षण देण्यास कोणतीही घाई करणार नाही, असे सांगताना त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनादेखील टोला लगावला. चव्हाण यांनी घाई केली आणि त्यामुळेच मराठा आरक्षण आता रखडले आहे.   
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील वाद तुम्ही सोडवणार का या प्रश्नाला उत्तर देताना जानकर यांनी सांगितले की, या दोघांमधील वाद मिटावा यासाठी मी प्रयत्न करेन. तसेच अजून कोठे वाद झाला तर मी पॅचवर्क करीन असे देखील त्यांनी सांगितले. महादेव जानकर यांच्या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...