आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त टीव्ही, पंखा व दोन लाइट वापरले, बिल मात्र 1 .41 लाख; शेतक-याचा उपोषणाचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- घरात दोन लाइट (बल्ब), एक पंखा आणि एक टीव्ही एवढीच विजेची  उपकरणे चालवणाऱ्या औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील वीज ग्राहकाला महावितरणकडून तब्बल १ लाख ४१ हजार रुपयांचे बिल आले अाहे.  

वसंतराव नरहरी क्षीरसागर  यांना २२ ऑगस्ट रोजी १ लाख १४ हजार ५८० रुपयांचे वीज बिल मिळाले.  त्यानंतर त्यांंनी  वीज मीटर पुन्हा तपासून योग्य बिल द्यावे आणि मीटर नादुरुस्त झाल्याने बदलून द्यावे अशी विनंती औंढा येथील वीज कंपनी कार्यालयात केली. परंतु मीटर बरोबर असून  देयकही बरोबर आहे, अशी भूमिका घेत कंपनीने ग्राहकाची मागणी अमान्य केली. त्यानंतर आता चालू महिन्याचे थकीत देयके आणि अगोदरच्या रकमेवरील व्याज असे एकूण १ लाख ४१ हजार रुपयांचे देयक  दिले. या प्रकारामुळे सदर शेतकरी चक्रावून गेला असून त्याने आज येथील अधीक्षक अभियंत्याकडे तक्रार केली आहे. आठ दिवसांत योग्य देयक देऊन नवीन मीटर बसवून दिले नाही तर महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा वसंतराव क्षीरसागर यांनी दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...