आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजलगावात- नाफेडच्या खरेदी केंद्रांवर बंपर अावक; मात्र यंत्रणाच ताेकडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव- माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फुले पिंपळगाव येथील टी.एम.सी.येथे नाफेडच्या खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी शेतकरी अाणत अाहे. बंपर अावक हाेत असल्याने व यंत्रणा कमी पडत असल्याने मापासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत अाहे. 
 
विक्रीसाठी अालेली तूर ठेवण्यास पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकाेनातून तसेच मापासाठी लागणारा अवधी लक्षात घेत दहा दिवस या केंद्रावर शेतकऱ्यांनी तूर अाणू नये, असे अावाहन करण्यात अाले अाहे, तर शिरूर कासार तालुक्यातील पाडळी फाटा येथील नाफेडच्या केंद्रावर केवळ बारदान्याअभावी तूर खरेदी  अाहे. 
  
माजलगाव बाजार समितीअंतर्गत फुलेपिंपळगाव येथील टी.एम.सी. प्रकल्पात नाफेडच्या वतीने तूर खरेदी केंद्र सुरू आहे.  या केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तूर  विक्रीसाठी आणली आहे. यामुळे टी.एम.सी. परिसरातील मैदान पूर्णतः तुरीच्या पोत्यांनी भरून गेले आहे. शेतकऱ्यांनी अाणलेली तूर ठेवण्यासदेखील जागा अपुरी पडत असल्याने  शेतकऱ्यांना अनेक गैरसाेईना सामाेरे जावे लागत अाहे.
 
अनेक शेतकरी मापासाठी अाठ दिवसांपासून ताटकळले अाहेत. बाजार समितीचे शेतकऱ्यांच्या तुरीचे माप करण्यासाठीयेथील केंद्रावर दाेन वजनकाटे हाेते.  
मात्र, वाढती अावक लक्षात घेत पाच वजनकाटे वाढवण्यात अाले. सात वजनकाट्यांवर माप करण्यात येत आहे. रोज १३००  क्विंटल तुरीचे माप होत आहेत.
 
१२  जानेवारीपासून या केंद्रावर अातापर्यंत २१  हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली. अावक वाढल्याने केंद्रावर अालेल्या तुरीच्या मापासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत अवधी लागेल.   इतर शेतकऱ्यांनी  खरेदी केंद्रावर तूर आणल्यास  त्यांची  मापे होणार नसल्यामुळे  हाेणारी गैरसोय टाळण्यासाठी बाजार समितीने १० दिवस तूर अाणू नये, असे अावाहन केले अाहे.   
 
बारदाना नाही   
- शिरूर कासार तालुक्यातील पाडळी फाटा येथे नाफेडअंतर्गत तूर खरेदी केंद्र  १६ दिवस  बारदाना नसल्याच्या कारणामुळे  बंद हाेते,  तर १५ दिवसांत ९ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात अाली. तर  नऊ दिवसांपासून  तूर अाणलेल्या टॅक्टर, पिकअप, बैलगाडीच्या रांगा लागल्या. साठवणुकीसाठी जागा व बारदाना नसल्याने खणेदी बंद अाहे. शेतकऱ्यांकडे जास्त तूर शिल्लक असल्याने खरेदी सुरू करावी. - गाेकुळ सानप, भाजप
 
सध्या शेतकऱ्यांनी तूर अाणू नये   
- आजही तुरीची मोठ्या प्रमाणात आवक आहे. अाधी अालेल्या तुरीचे माप हाेणे अावश्यक अाहे. अवकाळी पाऊस अथवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे हाेणारे संभाव्य नुकसान  व गैरसाेय टाळण्यासाठी  शेतकऱ्यांनी तूर्त तूर अाणू नये.  गर्दी न करता सबुरीने  खरेदी केंद्रावर तूर विक्रीस आणावी. नाफेडचे तूर खरेदी केंद्र हे चालूच राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी  करू नये. 
- अशोक डक, सभापती, माजलगाव बाजार समिती.   
 
 
बातम्या आणखी आहेत...