आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाची मागणी २ हजार कोटींची, बोळवण होणार हजार कोटीवर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- सलग चार वर्षांपासून मराठवाड्याच्या पाठीमागे लागलेले दुष्काळाचे दुष्टचक्र पाठ सोडण्याचे नाव घेईना. अस्मानी संकटापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्याला आता सुलतानी मदतीची गरज आहे. संपूर्ण पावसाळा संपून गेला तेव्हा कुठे मायबाप सरकारला जाग आली. आजपासून १४ अधिकाऱ्यांची ४ पथके दुष्काळाची पाहणी करणार आहेत. मराठवाड्याला ३ हजार कोटींची अपेक्षा आहे. प्रशासन सुमारे २ हजार कोटींची मागणी करणार असून नेहमीप्रमाणे १००० ते १४०० कोटींवर मराठवाड्याची बोळवण होण्याची शक्यता सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला वर्तवली आहे.

वार्षिक सरासरीच्या तुलनेमध्ये या वर्षात अत्यल्प पाऊस झाला. अाैरंगाबाद विभागातील ७६ तालुक्यांमध्ये जून ते अाॅक्टाेबरदरम्यान केवळ ४३३ िममी पाऊस झाल्याची नाेंद प्रशासनाकडे अाहे. परिणामी खरीप तर गेले, शिवाय रब्बीची आशाही संपल्यात जमा अाहे. उसनवारी, प्रसंगी सावकाराकडून व्याजाने कर्ज काढत अनेक शेतकऱ्यांनी शेतीखर्चासह घरगाडा कसाबसा चालवला. २०१३ च्या अखेरीस व २०१४ वर्षाच्या प्रारंभाला मराठवाड्यात गारपीट, वादळी वारे, कमी पाऊस या नैसर्गिक संकटांमुळे मराठवाड्यातील शेतकरी पुरता हताश झाला. त्यातूनही त्याने उभारी घेतली. मात्र, दुष्काळाने काही पाठ सोडली नाही. २०१५ मध्येही अस्मानी संकटाने घेरले. आता मात्र शेतकऱ्यांनी गुडघे टेकले आहेत. त्यामुळे मदार फक्त सरकारी अनुदानावर आहे. तांत्रिक अडचणी काढून सरकारही फक्त समित्या पाठवण्याचा सोपस्कार करत आहे. मदत मिळते मात्र ती खूप उशिरा. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यापेक्षा वाईट अवस्था पशुधनाची आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ७४ चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या असून त्यापैकी २० छावण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये १७ हजार ५६३ जनावरे दाखल आहेत. शासनाने या वर्षी ३८० चारा छावण्यांमध्ये चार काेटी १० लाख जनावरांची सोय करण्याचे नियोजन केलेले आहे.
आतापर्यंत मराठवाड्याला ३८०० काेटी
अातापर्यंत मराठवाड्यात सर्वाधिक कापूस व साेयाबीनचे नुकसान झालेे. पथकाच्या पाहणीनंतर मराठवाड्याला एकूण ३ हजार ८०० काेटी रुपयांची अार्थिक मदत मिळाली अाहे. वर्षनिहाय मदत : २०११-१२ : ६७५ काेटी, २०१२-२०१३ : ५६१ काेटी, २०१३-२०१४ : १६५२ काेटी, २०१४-२०१५ : ५८७ काेटी, फेब्रुवारी, मार्च २०१५ : ४ काेटी. एकूण : ३८०० काेटी.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, किती शेतकऱ्यांनी केल्या आत्म हत्या, काय आहे मराठवाड्यातील शेतकऱ्याची स्थिती...