आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असह्य दुष्काळी झळा : मांजरा धरणाच्या पायथ्याशी १२ हजार हेक्टरला फटका..!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिराढोण - उस्मानाबाद-बीड जिल्ह्यांच्या सीमेवर १९८२ मध्ये मांजरा नदीवर बांधण्यात आलेल्या २२४.०९३ दलघमी साठवण क्षमतेच्या मांजरा प्रकल्पात येणारा पाण्याचा ओघ दुष्काळामुळे २०१२ पासून आजअखेर पूर्णपणे थांबल्याने हे धरण कोरडेठाक पडले आहे. एकेकाळी कळंब तालुक्यातील खडकी, लोहटा पूर्व, करंजकल्ला, लोहटा पश्चिम, कोथळा, हिंगणगाव, दाभा, आवाड शिरपुरा, सौंदणाआंबा, वाकडी या गावांतील शेतीसह धरण परीक्षेत्रातील ११ हजार ८८८ हेक्टर शेती क्षेत्राकरिता वरदान ठरलेल्या या धरणाच्या पायथ्याशी आता दुष्काळाच्या झळा असह्य झाल्या आहेत.

दुष्काळाच्या प्रकोपामुळे धरणाच्या पायथ्याशी असलेल्या सधन गावांनाही अवकळा आली आहे. मांजरा धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी अडवण्यात आलेल्या नदीप्रवाहाच्या माध्यमातून साठवण्यात येणाऱ्या पाण्याचा उपयोग परिसरातील लोकांची तहान भागवण्याबरोबरच शेती सुजलाम-सुफलाम करण्यासाठी झाला होता. पाणीपुरवठा करण्याकरिता नदीच्या मुख्य पात्राबरोबरच ९० किलोमीटर लांबीच्या डाव्या व ७८ किलोमीटर लांबीच्या उजव्या कालव्याचा उपयोग करून धरण परीक्षेत्रातील शेती व्यवसायास ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यास मोलाची मदत झाली. याचा लाभ कळंब तालुक्यातील मांजरा तीरावरील १० ते १२ गावांना झाला. या गावांतील शिवारातून धरणाचे कालवे गेल्याने शिवारास मुबलक पाणी उपलब्ध झाले.
परिणामी मांजरा तीरावरील या गावांचा शिवार १०० टक्के बागायती म्हणून गणला जाऊ लागला. ऊस उत्पादन करून आर्थिक प्रगती साधली. मुबलक पाणीपुरवठ्याला अपार कष्ट, जिद्दीची जोड देऊन या भागातील शेतकऱ्यांनी अल्पावधीत ऊस पिकवणारा प्रदेश म्हणून ओळख निर्माण केली. शेती व्यवसायातील उत्पन्नाच्या जोरावर परिसरामध्ये आर्थिक सुबत्ता नांदू लागली. त्यामुळे शेतकऱ्यांची मुले चांगल्या ठिकाणी शिक्षण घेऊ लागली होती. धरणामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक, मानसिक मनोबल उंचावले होते. परंतु २०१२ पासून या धरण परीक्षेत्रातील पर्जन्यमानामध्ये कमालीची घट झाल्याने धरणातील पाणीसाठा कमी होत जाऊन आज धरण पूर्णपणे कोरडे पडले आहे. मागील चार वर्षांपासून शेतीला पाणीपुरवठा बंद झाल्याने शेती कोलमडली आहे. हरितपट्टा म्हणून ओळख असणाऱ्या परिसरामध्ये पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतमजुरांची उपासमार
परिसरातील ऊसशेतीकरिता बारमाही मजुरांची गरज लागत असल्याने सहजपणे रोजगार उपलब्ध होत होता. दुष्काळामुळे बागायती ओसाड पडल्याने मजूर मिळेनासा झाला असून उपासमारीची वेळ आली आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कर्जाचा डोंगर...