आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजनेवर लाखो रुपयांचा खर्च तरीही गावची भिस्त टँकरवरच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी - चार वर्षांपूर्वी पाणीपुरवठा योजनेमुळे टंचाईवर मात करणाऱ्या आष्टी तालुक्यातील साबलखेड गावावर यंदा कमी पावसामुळे दुष्काळाचे संकट ओढावले असून टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. एकीकडे योजनेवर लाखो रुपये खर्च झाले असले तरी पावसावरच अवलंबून राहण्यावी वेळ आली आहे. गावातील १६ पैकी १२ हातपंप बंद पडले आहेत. तालुक्यावर चौथ्या वर्षी दुष्काळाचे संकट आहे.

तालुक्यात सध्या १५१ शासकीय व १४५ टँकरने १३५ गावे व १२१ वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील साबलखेड हे २१५० लोकसंख्येचे गाव असून सध्या दुष्काळामुळे होरपळत आहे. चार वर्षांपूर्वी या गावातील पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी भारत निर्माण योजनेतून पाणीपुरवठा योजनेला २००८ मध्ये मंजुरी मिळाल्यांनतर ५५ लाख रुपये खर्च करून धानोरा येथील कांबळी प्रकल्पाखाली पाणी पुरवठ्यासाठी विहिरीचे खाेदकाम करण्यात येऊन गावातील पाइपलाइन करण्यात आली. यातच ५५ हजार लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात आली. पहिल्या वर्षी गावात विहिरीला मुबलक पाणी लागल्याने साबलखेडला मुबलक पाणी मिळाले. परंतु आष्टी तालुक्यातच सलग चार वर्षे पाऊस कमी होत गेल्याने विहीर सध्या कोरडी पडली आहे. त्यामुळे साबलखेड गावात पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. सध्या गावात १६ हातपंपापैकी फक्त दोन हातपंप सुरू असून अन्य हातपंप पाण्याअभावी बंद पडले आहेत. गावात सध्या दोन हातपंपावर दिवसाकाठी ५० घागरी पाणी मिळत असल्याचे सरंपच शरद दिनकर देसाई यांनी सांगितले. गावाजवळून जाणाऱ्या कांबळी नदीचे वर्षभरापूर्वी ग्रामस्थांच्या लोकसहभागातून खोलीकरण, सरळीकरण करण्यात आले आहे. यासाठी जवळपास दहा लाख रुपयांचा खर्च आलेला असून साडेतीन किलो मीटरचे खोलीकरण पूर्ण झाले आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, जानेवारीपासून टँकर सुरू ... ट्रॅक्टरने पाणीपुरवठा.... अशी टंचाई पाहिली नाही.... २५० विहिरी, बोअर ... दिवसाआड पाणी... लातूरला पाणी देण्यास परभणी अनुकूल