आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाच्या कळा, प्रत्येकाला वेगळ्या झळा, आवळली लातूर-उस्मानाबादची आर्थिक नाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर/उस्मानाबाद - तीन वर्षांपूर्वी लातूर –उस्मानाबादेत चांगला पाऊस झाला. तेव्हा लातूरच्या कृषी उत्पन्न बाजारात रोज ५० ते ६० हजार क्विंटल सोयाबीनची आवक होती. गाड्यांच्या दोन कि.मी.पर्यंत रांगा लागायच्या. यंदा सोयाबीनची आवक ४ ते ५ हजार क्विंटलपर्यंत घसरली आहे…डाळ उद्योगातील वार्षिक उलाढाल यंदा ५० टक्क्यांनी घटली आहेे. गूळ मार्केटची व्यथाच निराळी, गुळाची आवक ९५ टक्क्यांनी कमी झाली आहे. कपडा बाजारातील उलाढाल २० टक्क्यांनी घटली. शहरातील क्रीम भागातील फ्लॅटचे दर २५ टक्क्यांनी उतरले. व्यापारी पेठेतील उलाढाल ६० ते ७० टक्के कमी झाली आहे…सराफातील खरेदी-विक्रीच्या झळाळीला ७५ टक्के कपातीचा डाग लागला आहे. कोणतेही क्षेत्र दुष्काळाच्या झळांपासून वाचलेले नाही. लातूरची आर्थिक नाडीच दुष्काळाने आवळल्याचे चित्र आहे. साडेचार लाख लोकसंख्येच्या लातूर जिल्ह्यातून १० ते १२ टक्के लोकांनी कामासाठी स्थलांतर केले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, लातूर कृषी उत्पन्न बाजार : आर्थिक गणित... आडत बाजार
उलाढाल ३५ टक्क्यांवर... डाळ उद्योग उलाढाल ५०% घटली.... गूळ मार्केट ९५ टक्के गोडवा घटला.... व्यापार उदीम ७० टक्के घट.... इक्विटी, कमोडिटी ९० टक्के घसरण.... कपडा व्यापार
२० टक्के घट... वैद्यकीय व्यवसाय ७५ टक्के फटका