आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामात बीडचे मोठे याेगदान, केंद्रानेही केला बहुमान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - ‘हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम अाणि बीड जिल्हा’ या ग्रंथाचे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सांस्कृतिक स्राेत व प्रशिक्षण विभागाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर प्रकाशन करण्यात अाले. ही अभिमानास्पद बाब असून बीड जिल्ह्याचा स्वातंत्र्यसंग्राम अाता राष्ट्रीय स्तरावर पाेहोचणार अाहे.

हे काम डाॅ. सतीश साळुंके यांनी केले अाहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे अखेरचे पर्व म्हणून हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामाकडे पाहिले जाते. या संग्रामाचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ हे अंबाजाेगाईच्या याेगेश्वरी विद्यालयात शिक्षक हाेते. त्यामुळे या लढ्यात बीड जिल्ह्याला माेठे महत्त्व प्राप्त झाले. हैदराबादच्या निझामाशी व त्याचा कट्टर समर्थक कासीम रझवी याच्या रझाकारांविरुद्ध दाेन हात करता करता बीड जिल्ह्याच्या भूमीत २१ तरुण शहीद झाले. स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात बीड जिल्ह्याने लढलेला संग्राम अद्वितीय हाेता. मात्र, हा प्रेरणादायी इतिहास अंधारातच हाेता. त्यामुळे दहा-पंधरा वर्षांपासून साळुंके यांनी हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामावर लेखन केले. बीड जिल्ह्याच्या स्थानिक इतिहासाचा अभ्यास करून मांडणी केली. त्याची दखल केंद्र शासनाने घेतली. एखाद्या जिल्ह्याचा इतिहास कसा मांडता येताे याचे उदाहरण अन्य स्थानिक इतिहासकारांसमाेर अाणण्याच्या दृष्टीने डाॅ. साळुंके यांच्या ‘हैदराबादचा मुक्तिसंग्राम अाणि बीड जिल्हा’ या ग्रंथाचे प्रकाशन केले.
बातम्या आणखी आहेत...