आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये ओबीसींचा, तर जालन्यात दलितांचा मोर्चा, पिवळ्या निळ्या झेंड्यांनी फुलला रस्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिनेश लिंबेकर । बीड - ओबीसी जातनिहाय जनगणना तातडीने करा, नॉनक्रिमिलिअरची अट रद्द करा, मूळ ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर सूडबुद्धीने होणारी कारवाई थांबवा या मागण्यांचे फलक हाती घेत गुरुवारी दुपारी जिल्ह्यातील हजारो ओबीसी समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक महामोर्चा काढून वज्रमूठ आवळली.

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर गुरुवारी सकाळी ११ वाजेपासूनच ओबीसी बांधव जमायला सुरुवात झाली. दुपारी एक वाजता जिल्हा क्रीडा संकुलाकडे जाणारा रस्ता पिवळ्या झेंड्यांनी फुलून गेला होता. मोर्चात सर्वात पुढे महिला व मुली होत्या. हा मोर्चाही मराठा समाजाच्या शिस्तप्रिय मोर्चासारखा होता. सुभाष रोड, माळीवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक, कारंजा, राजुरी वेसमार्गे हा मोर्चा दुपारी पावणेतीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचला. त्यानंतर नगर रोडमार्गे हा दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मंचावर ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी निवेदनाचे वाचन केल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार व निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी निवेदन स्वीकारले. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी जवळपास एक हजार पोलिस तैनात करण्यात आले होते.

मालेगावचे भुजबळ समर्थक मोर्चात
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ समर्थक व ओबीसी नियोजन समितीचे कार्यकर्ते ३५ वाहनांनी बीडमध्ये मोर्चासाठी आले होते. त्यांनीही भुजबळांवरील सूडबुद्धीने होणारी कारवाई थांबवावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
पुढे वाचा, जालन्यातील मोर्चाबाबत..
बातम्या आणखी आहेत...