आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन पराजित उमेदवारांची लॉटरी, फेरमतमोजणीत दोघे विजयी घोषित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी - वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी प्रक्रियेत मतपत्रिकेचे एकत्रीकरण करताना कर्मचाऱ्यांनी चुकीची आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिल्याने विजयी उमेदवारांना पराजित घोषित केले होते. त्यामुळे पराजित उमेदवारांनी जिल्हा उपनिबंधकाकडे फेरमतमोजणी करण्याची मागणी केली होती. त्या मागणीवर सोमवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुनावणी झाली. मंगळवारी फेरमतमोजणी होऊन पराजित उमेदवार विजयी घोषित करण्यात आले.
वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी प्रक्रियेत मतपत्रिकेचे एकत्रीकरण करताना एस.एस.तारडे व एन.एम.वाघमारे या दोन कर्मचाऱ्यांनी चुकीची आकडेवारी दिली होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी एच.पी.कांबळे यांनी विजयी उमेदवारांना पराजित व पराजित उमेदवार विजयी घोषित केले होते. त्यामुळे त्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबितही केले.
पराजित उमेदवार गुलाब राऊत, अॅड. राज शेंडगे पाटील व सुभाष साळवे यांनी सोमवारी फेरमतमोजणीची मागणी केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी एच.पी.कांबळे यांनीही जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सदरील कर्मचाऱ्यांची तक्रार केली होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी ३ वाजता फेरमतमोजणीला सुरुवात झाली. ग्रामपंचायत मतदारसंघातील भाजपचे पराजित उमेदवार सुभाष साळवे हे ४ मतांनी विजयी झाले. त्यांच्या विरोधातील रा.काँ.चे रतन व्यंकटी सौंदरमल यांना विजयी घोषीत करण्यात आले होते. सुभाष साळवे यांना १२९ मतदान झाले होते, तर रतन व्यंकटी सौंदरमल यांना १२५ मतदान मिळाले होते. परंतु १३५ मतदान झाल्याचे घोषित केले होते. त्यानंतर व्यापारी मतदारसंघात गुलाब राऊत हे विजयी घोषित केले ते ०२ मतांनी विजयी झाले. त्यांच्या विरोधात भिक्कम आंधळे यांना विजयी घोषित केले होते. गुलाब राऊत यांना ११८ तर भिक्कम आंधळे यांना ११६ मतदान मिळाले होते. हमाल मापाडी मतदारसंघ व सेवा सहकारी मतदारसंघातील कोणत्याही उमेदवारांची हरकत नसल्यामुळे फेरमतमोजणी होणार नाही, असे जिल्हा उपनिबंधक के.एम.घोलकर यांनी सांगितले.
एकूण १८ संचालक
समितीमध्ये एकूण १८ संचालक आहेत. दिनांक ६ सप्टेंबर रोजी मतदान झाले. त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता मतमोजणी झाली. या मतमोजणीत भाजपचे १२ व राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ उमेदवार विजयी झाले होते. आधीच्या आिण नंतरच्या निकालानंतरही पक्षीय
बलाबल तेच रािहले.

पराजित होते पराजितच
बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदारसंघाच्या सर्वसाधारण जागेसाठी अॅड.राज पाटील व माजी सभापती विक्रम बादाडे यांच्या पत्नी गंगाबाई बादाडे उभे होते. मतपत्रिकेचे एकत्रीकरण करताना गंगाबाई बादाडे विजयी झाल्या होत्या. या निकालावर अॅड. राज शेंडगे पाटील यांनी हरकत घेतली होती. परंतु मंगळवारी झालेल्या फेरमतमोजणीत केवळ एका मताने अॅड. राज पाटील पुन्हा पराजित झाले. त्यामुळे पराजित होते पराजितच राहिल्याने स्वप्नावर पाणी फिरले.