वैजापूर - विहिरीत पडून २७ वर्षीय भोळसर विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना नारायणपूर शिवारात शुक्रवारी रात्री घडली. सुरेखा ज्ञानेश्वर ठोंबरे (२७, रा. नारायणपूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सुरेखा या भोळसर स्वभावाच्या असून शुक्रवारी रात्री त्या घराबाहेर आल्या असता समोरील विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष घोडके, हवालदार के. एम. मोरे, बाबासाहेब धनुरे आदींनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.