आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्यांनाही पाच पिलं होतात, त्याला महापौर करायचं का? सुनीता चाळक यांचा पलटवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- लातूरचे महापौर अख्तर शेख यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना, मी पाच मुलांचा बाप असून माझ्यावर आरोप करणाऱ्यांना चार वर्षांत मूलच झालेले नाही, मग मी निष्क्रिय कसा, असा सवाल केला होता. त्याला उत्तर देताना शिवसेनेच्या नगरसेविका सुनीता चाळक यांनी कुत्र्यांनाही पाचपेक्षा अधिक पिलं होतात, त्याला महापौर करायचं का? असा प्रश्न विचारत महापौरांवर पलटवार केला आहे.

महापालिकेच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभारामुळे लातूरकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. त्यातून आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शेख यांनी चार दिवसांपूर्वी बेताल वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहेत. महापौरांच्या या वक्तव्यावर खवळलेल्या शिवसेनेनं महापालिकेत राडा करून संपर्क नेते संजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची मोडतोड केली. तसेच आयुक्तांना घेराव घातला. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविका सुनीता चाळक यांनी रुद्रावतार दाखवत महापौरांना पाण्याचा प्रश्न समजत नव्हता म्हणून पाणी फेकायचं होतं. पण ते शक्य नव्हतं म्हणून बाटली फेकली. परंतु महापौरांनी समस्त महिला जातीचा अपमान करणारं वक्तव्य केलं. पाच मुलं होणं मोठी गोष्ट नाही. कुत्र्यांनाही पाचपेक्षा अधिक पिलं होतात, त्याला महापौर करायचं का? असा सवाल चाळक यांनी विचारत जोपर्यंत महापौर महिलांची जाहीर माफी मागात नाहीत तोपर्यंत लातूर मनपाचं सभागृह चालू देणार नाही, असा इशाराही चाळक यांनी दिला