आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड एमआयएमचा बालेकिल्ला व्हावा, आमदार इम्तियाज जलील, वारिस पठाणयांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड -नांदेड हा एमआयएमचा बालेकिल्ला व्हावा यासाठी आमचे विशेष लक्ष आहे, अशी माहिती एमआयएमचे आमदारद्वय इम्तियाज जलील आणि वारिस पठाण यांनी दिली. ते दोघे शनिवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. एमआयएमच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

काही कार्यकर्ते एमआयएममध्ये प्रवेश करणार आहेत. त्या कार्यक्रमासाठी ते आले आहेत. एमआयएम पक्ष सर्वसमावेशक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. केवळ एका जातीची किंवा धर्माची पार्टी अशी एमआयएमची ओळख असू नये.

सर्व धर्मांतील, जातींतील कार्यकर्ते या पक्षात यावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही त्या दृष्टीने सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला असल्याचे इम्तियाज जलील व वारिस पठाण यांनी सांगितले. याकूब मेमन प्रकरणात आमची भूमिका केवळ धर्मवादी, जातीयवादी नव्हती. कायद्याच्या दृष्टीने पक्षाने भूमिका घेतली. देशातल्या विविध जाती-धर्मांच्या लोकांनीही नंतर ती भूमिका उचलून धरली, असेही आमदारांनी सांगितले. नांदेड हा एमआयएमचा बालेकिल्ला व्हावा यासाठी आमचे विशेष लक्ष आहे, असेही ते म्हणाले.
एमआयएमचे आमदारद्वय इम्तियाज जलील आणि वारिस पठाण शनिवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या वेळी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन व इतर पदाधिकारी उपस्थित होते. छाया : मुनवरखान पठाण