आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकप्रमाणे तुरीला भाव द्या; आमदार बाबाजानी दुर्राणी यांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- जिल्ह्यात तुरीच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झालेली असताना मोजक्याच ठिकाणी तूर खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, तर भावाच्या कारणावरून जिल्ह्यातील बहुतांश आडत व्यापाऱ्यांनी खरेदी न करण्याची भूमिका घेऊन बाजारपेठाच बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उद््भवलेल्या या परिस्थितीवर तत्काळ निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

त्यामुळे सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्यालय व उपबाजारपेठांच्या ठिकाणी वाढीव  शासकीय खरेदी केंद्रे सुरू करावीत तसेच कर्नाटक सरकारप्रमाणे राज्य शासनाने प्रतिक्विंटल ४५० रुपये बोनस द्यावा,  अशी मागणी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  येत्या उन्हाळी अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्नही उपस्थित केल्याचेही आ.बाबाजानी यांनी यावेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...