आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल चोराने घेतला युवकाचा जीव, एक तासभर रेल्वे रुळाजवळच हाेता पडलेला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव -  रेल्वे दरवाजात बसलेल्या प्रवाशाच्या हाताला काठी मारून मोबाइल पाडणे, हातातील मोबाइल हिसकावण्याचे प्रकार जळगाव रेल्वेस्थानकाच्या जवळ दररोज घडत आहेत. पाेलिसांनी या चाेरट्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे  रविवारी अाैरंगाबाद येथील युवकाला जीव गमवावा लागला आहे.    

अाैरंगाबाद शहरातील पैठणगेट परिसरातील दाळवाडीत राहणारा नरेश चंद्रप्रकाश जयस्वाल (वय १९) हा ग्वाल्हेर येथील शासकीय इन्स्टिट्यूट अाॅफ हाॅटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत हाेता. गेल्या अाठवड्यात सुट्या असल्याने ताे घरी अाला हाेता. रविवारी सचखंड एक्स्प्रेसने नरेश त्याचा मित्र अपूर्व रघुनाथ जानबा याच्यासाेबत ग्वाल्हेर येथे जात हाेता. सचखंड एक्स्प्रेसच्या एस-१२ या बाेगीतून नरेश अाणि अपूर्व प्रवास करत हाेते. रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रेल्वे जळगाव स्थानकावरून भुसावळकडे मार्गस्थ होत असताना नरेशच्या माेबाइलवर काेणाचा तरी फाेन अाला. त्यामुळे ताे माेबाइलवर बाेलत बाेलत दरवाजाजवळ गेला. त्या ठिकाणी खाली बसून ताे माेबाइलवर बाेलत होता.  गाडी तहसील कार्यालयाजवळ असताना रेल्वे रुळाजवळ उभ्या असलेल्या एका चाेरट्याने नरेशच्या हातातील माेबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी नरेशच्या हाताला झटका लागल्याने तोल जाऊन तो खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला.
 
टीटीने मदत केली नाही : अपघात घडल्यानंतर अपूर्व तिकीट तपासणीसकडे गेला. मात्र, त्यांनी काहीच मदत केली नाही. त्यामुळे त्याला  प्रवासी अाणि नागरिकांनी मदत केली. पाेलिसही एक तासभर अाले नाहीत. त्यामुळे नरेश एक तासभर रेल्वे रुळाजवळच पडलेला हाेता. एका तासानंतर रुग्णवाहिका अाली. त्यानंतर नरेशला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात अाले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...