आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलवरून माहिती विचारून बँकेतून 41 हजार काढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर  - मोबाइलवरून माहिती विचारून बँक खात्यातून परस्पर ४१ हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी येथील  गांधी चौक पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर शहरातील सीतारामनगर भागात राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी काशीनाथ तुकाराम कुलकर्णी यांना शनिवारी  सायंकाळी एका व्यक्तीचा फोन आला आणि आपण बँकेतून बोलत असून तुमचे आधार कार्ड लिंक करावयाचे आहे, असे सांगितले. त्यानंतर कुलकर्णी यांनी आपल्या आधार कार्डची व एसबीआय बँकेच्या एटीएम कार्डवरील १६ आकडी नंबर समोरच्या व्यक्तीला सांगितला. थोड्या वेळाने कुलकर्णी यांच्या मोबाइलवर काही एसएमएस आले.
 
आरोपीने पुन्हा फोन करून या एसएमएसमधील माहिती विचारून घेतल्यानंतर कुलकर्णी यांच्या बँकेतील खात्यावरून ४१ हजार रुपये काढून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कुलकर्णी यांनी गांधी चौक पोलिसांत धाव घेतली.  
बातम्या आणखी आहेत...