आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...अखेर जमीन परत, कर्जफेडीसाठी सावकाराने केली होती मुलगी, सुनेची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जापोटी गहाण ठेवलेली जमीन सावकाराने हडप केली. जमीन परत मागण्यासाठी शेतकरी गेला असता सावकाराने थेट त्याच्या सून, मुलीला पाठवण्याची भाषा केली. अखेर मंगळवारी दै.‘दिव्य मराठी’ने सावकाराचे हे कृत्य समाेर आणताच तो ताळ्यावर आला अन‌् शेतकरी इंदर मुंडे यांना त्यांची जमीन परत करून मुलीच्या नावे रजिस्ट्रीही करून दिली.

धारूर तालुक्यातील कारी येथील शेतकरी इंदर मुंडे यांनी सन २००९ मध्ये मुलीच्या लग्नासाठी परवानाधारक सावकाराकडून १ लाख ३५ हजारांचे कर्ज घेतले होते. मुंडे यांनी सन २०१२ मध्ये मुद्दल व २०१५ मध्ये व्याज परत करुनही सावकाराने जमीन परत देण्यास नकार देत जमीन स्वत:च्या मुलाच्या नावावर केली होती. जमीन परत मिळत नसल्याने आठ दिवसांपासून शेतकरी इंदर मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने शेतकऱ्याचा मुलगा आणि पत्नीला रुग्णालयात दाखल होते.

दरम्यान, जमीन परत देण्यासाठी सावकाराने थेट मुलगी आणि सुनेचीच मागणी केल्याने मोठी खळबळ उडाली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई करण्याबाबत बीड पोलिसांना विचारणा केली होती. परंतु, अशा प्रकारची तक्रार शेतकरी मुंडेंनी कोणत्याही ठाण्यात दिलेली नव्हती. त्यामुळे ‘तक्रार आली तर कारवाई करू’, असे एसपी अनिल पारसकर यांनी स्पष्ट केले होते. मंगळवारी ‘दिव्य मराठी’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते.

अन् मुलीच्याच नावे जमीन
मंगळवारी सावकाराने धारूर येथील रजिस्ट्री कार्यालयात शेतकरी इंदर मुंडे यांच्यासह जाऊन त्यांची जमीन परत केली. मुंडे यांची मुलगी जिजाबाई कागणे यांच्या नावे ही जमीन करण्यात आली. या प्रकरणी राष्ट्रीय क्रांती सेनेचे परमेश्वर मुंडे यांनीही पाठपुरावा केला होता.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...