आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वर मान्सून मैफलीत श्रोते न्हाले स्वरात,पावसानेही लावली हजेरी, बीड शहरात श्रोते मंत्रमुग्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - मान्सूनच्या स्वागतासाठी रसिक फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘स्वर मान्सून’ या संगीताच्या बहारदार कार्यक्रमात विश्वनाथ दाशरथे, संध्या केळकर आणि भाविषा दाशरथे यांनी आपल्या गायनाने रसिक श्रोत्यांना स्वरात चिंब भिजवले. हा कार्यक्रम सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे ही मैफल अधिकच रंगली. 
 
रसिक फाउंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी मान्सूनच्या स्वागतासाठी स्वर मान्सून या मैफिलीचे आयोजन करण्यात येते यावर्षीची मैफिल रविवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात श्रोत्यांच्या तुडुंब प्रतिसादात रंगली.मैफिलीचा प्रारंभ विश्वनाथ दाशरथे यांनी राग सूर मल्हारने केली विलंबित एकतालातील बोल होते ‘बरसन लागी तर द्रुत तीन तालातील बोल होते ‘बादरवा बरसन आये भरदार आवाज,हृदयाला भिडणारा खर्ज आणि षड्ज, ताना, बोलताना यांनी हे गाणे समृध्द झाले.यानंतर संध्या केळकर यांनी राग बागेश्री मध्ये शाम घन छाये ही चीज त्रितालात सादर केली.तर दाशरथे यांनी राग मांज खमाज मध्ये ‘आये सावनका माहिना ही कजरी सादर करून एक वेगळा गायन प्रकार ऐकवला,केळकर यांनीही सावन की ऋत आई री सजनवा ही शोभा गुर्टू यांची कजरी गाऊन श्रोत्यांची दाद मिळवली.भाविषा दाशरथे हिने झमके झोलिया री हा झुला प्रकार सादर केला. या उपशास्त्रीय गायनानंतर संध्या केळकर यांनी ये रे घणा , ये रे घणा ही आरती प्रभू यांची रचना सादर केली या नंतर त्यांनीच नभ उतरू आलं,अंग झिम्माड झालं हे गीत गायिले,त्यांच्या आला आला वारा संगे पावसाच्या धारा या गाण्याने श्रोत्यांना ठेका धरायला लावला. या नंतर विश्वनाथ दाशरथे यांनी नभ मेघाने आक्रमिले हे नाट्यगीत आणि ती गेली तेव्हा रिमझिम हे गाणे सादर केले यानंतर त्यांनी लागोपाठ या भवनातील गीत पुराणे ‘, या नवं नवल नयणोत्सवा( दोघे)’ घेई छंद मकरंद ‘, यती मन मम् मानीत या ‘, सुरत के पिया के छिंन बिसराये ही नाट्यगीते गाऊन बहार उडवून दिली आणि जोडूनच दिम तानाना दीर दीर तानु हा तराना सादर करीत श्रोत्यांच्या टाळ्या मिळवल्या ,यानंतर प्रख्यात व्हायोलिन वादक प्रमोद जांभेकर यांनी व्हायोलिनवर भेट तुझी माझी स्मरते आणि केतकीच्या बनी तिथे ही गाणी वाजवून श्रोत्यांना सुरेल भेट दिली. या सुरेल मैफिलीची सांगता विश्वनाथ दाशरथे यांनी रूप अरुपी रंग रंगिला, बिना आगीयन उजियारा,अवधूत ऐसा रूप तुम्हारा! या भैरवी रागातील भक्तीरचनेनी केली.मौफिलीत प्रमोद जांभेकर यांनी व्हायोलिन, शांतिभूषण चारठाणकर यांनी हार्मोनियम आणि राजगोपाल गोसावी यांनी तबल्यावर बहारदार साथसंगत केली,कार्यक्रमाचे रंजक सुत्रसंचलन अश्विनी दाशरथे यांनी करून मैफिलीची उंची वाढवली.प्रारंभी प्रास्ताविक राधेश्याम मुंदडा,आभार प्रदर्शन दीपक कर्णावट यांनी केले तर कलावंताचा परिचय मिलिंद सुंदर यांनी करून दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रसिक फाउंडेशनचे अध्यक्ष अमर डागा, सचिव मिलिंद सुंदर, राधेशाम मुंदडा, वाय.जनार्धन राव, डॉ.अनुराग पांगरीकर, विकास उमापुरकर, दिपक कर्नावट, प्रदिप मुळे, महेश वाघमारे, ईश्वर मुथ्था, प्रा.महेश कुलकर्णी, प्रा.सुदर्शन धुतेकर, राम मोटवाणी, ऍड.प्रशांत देशपांडे,, गोपाल मालु, विष्णुदास बियाणी, लक्ष्मीकांत खडकीकर यांनी परिश्रम घेतले. 
बातम्या आणखी आहेत...