आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेटबंदीनंतरच्या कारवाईत भाजप नेत्यांकडेच घबाड, खासदार माेहंमद सलीम यांचे टीकास्त्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- परदेशातील काळा पैसा अाणणे, भ्रष्टाचार संपवणे, फेक करन्सी, दहशतवाद संपुष्टात अाणणे ही सर्वच पक्षांची भूमिका असून  पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केलेल्या नाेटबंदीला अामचा विराेध नाही, परंतु या निर्णयामुळे गरीब  नागरिकांचे हाल हाेत आहेत.  सत्तेत एनडीएचेच सरकार असून  भाजपचे सरकार म्हणून बाेलले जाते. भाजपतील  सगळे नेते भ्रष्टाचारी नाहीत, पण नाेटबंदीनंतर  देशात  झालेल्या कारवाईत भाजप नेत्यांकडे घबाड असल्याचे उघडकीस अाले, असा अाराेप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संसद गटनेते  खासदार माेहंमद सलीम यांनी केला. 
 
बीड शहरात एसएफआयच्या राज्य अधिवेशनानिमित्त  बीडमध्ये आटल्यानंतर खासदार मोहंमद सलीम यांनी शासकीय विश्रामगृहावर  बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सचिव बब्रुवान पोटभरे, सीपीएमचे  राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य अशोक ढवळे, अखिल भरतीय जनवादी महिला संघटना महासचिव मरियम ढवळे, पी. एस. घाडगे, महाराष्ट्र किसान सभा अध्यक्ष अजित नवले, सीपीएम औरंगाबादचे पंडित मुंडे, राजकुमार घायाळ उपस्थित हाेते.
  
खासदार सलीम म्हणाले, नरेंद्र माेदी यांनी परदेशातील काळा पैसा गोळा करू, असे जाहीर केले हाेते. सत्तेत आल्यावर जनधनचे खाते उघडण्याचे  जाहीर केले. त्यात विदेशातील काळा पैसा टाकला जाईल, असे अाश्वासन दिले. परंतु विदेशातील काळा पैसा घेऊन येण्यासाठी पंतप्रधान माेदी यांच्याकडे सत्ता, पॉवर, यंत्रणा असतानही  ते काँग्रेस सरकारप्रमाणेच देशाच्या अांतरराष्ट्रीय संबंधाचा मुद्दा पुढे करून परदेश व काळा पैसा हे दोन्ही भाग वेगळे अाहेत, असे जाहीरपणे बाेलू लागले अाहेत.  देशामधील जनधन खात्यात विदेशातील काळा पैसा अाणण्याऐवजी देशात नोटबंदी करून देशी पैसा जनधनच्या खात्यात जमा करण्याचा विचित्र प्रकार सुरू केला अाहे.  त्याचा गंभीर परिणाम हा देशातील  सर्व प्रकारची अर्थव्यवस्थेवर हाेत असून त्या अडचणीत आल्या आहेत, असेही खासदार सलीम म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या  नोटबंदीच्या निर्णयाने  परेशानी वाढत आहे.  सरकार दर महिन्याला नियम बदलत आहे. डायनामिक नियम लागू करून ग्रामीण भागाचा विकास होत नाही, असेही ते म्हणाले.  
 
बातम्या आणखी आहेत...