आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यातील शेतकऱ्यांना मिळेल 2 हजार कोटींची कर्जमाफी- रावसाहेब दानवे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - राज्य सरकारने दिलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीतून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार असून त्याचा १ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होणार आहे. सरकारने यात १६-१७ मधील पीक कर्जाचा समावेश केला आहे. हे पीक कर्ज वाटप जवळपास १३७७ कोटींचे आहे. त्यामुळे यातील शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ होईल, शिवाय राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढवल्याने शेतकऱ्यांसाठी ही बाब दिलासा देणारी आहे, असेही दानवे म्हणाले.   
 
प्रदेशाध्यक्ष दानवे रविवारी जालना शहरात हाेते. या वेळी त्यांनी राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीची माहिती देताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ हाेणार असल्याचे सांगीतले. जिल्ह्यात विविध बँकांकडून दीड लाख ते दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेले व थकबाकी असलेले १ लाख ९६ हजार थकबाकीदार आहेत, तर त्यांच्याकडे २ हजार ५२३ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे खासदार दानवे यांनी सांगितले. 
 
त्यामुळे या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी जिल्ह्याला जवळपास दोन हजार कोटी रुपये राज्य सरकारकडून मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात २०१६-१७ या वर्षातील पीक कर्जाचा समावेश करण्यात आल्याने त्यासाठीचे १३७७ कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून १९ हजार ७१४ शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले असून त्यांच्या थकबाकीची रक्कम ४२ कोटी ८७ लाख रुपये आहे. 
 
त्याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी कर्ज नवे-जुने केले आहे अशा शेतकऱ्यांची संख्या ६० हजार असून त्यांच्याकडे त्यांच्या कर्जाची रक्कम १०१ कोटी रुपये आहे. त्यामुळे जिल्हा बँकेला शासनाकडून जवळपास १४३ कोटी रुपये मिळतील, असे दानवे यांनी सांगितले.  
 
रक्कम भरण्यास मुदतवाढ  
दीड लाखापेक्षा अधिक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची ही रक्कम भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पैशाची उपलब्धता करण्यासाठी वेळ मिळणार असल्याचे दानवे म्हणाले. कर्जाची नियमित परतफेड केलेत्या शेतकऱ्यांना त्यांनी परतफेड केलेल्या कर्जाच्या २५ टक्के अथवा कमाल मर्यादा २५ हजार रुपये आणि किमान १५ हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. अशा शेतकऱ्यांनही आपल्या पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी ३१ जुलै २०१७ पर्यंतीची मुदतवाढ दिल्याने त्यांना २०१६-१७ मधील कर्जाची परतफेड करण्यास पुरेसा अवधी मिळणार असल्याचे खासदार दानवे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...