आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प. निवडणूक मैदानात खासदार, आमदारांची मुले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - जिल्हा परिषदेची निवडणूक बुधवारी जाहीर झाली आहे.  निवडणुकीची घोषणा बाकी असतानाच जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय कुटंुबातील कोणत्या सदस्याने, कोठून उमेदवारी दाखल करायची, याची जोरदार तयारी झाली होती. 

जनाधार पाठीशी असलेल्या सामान्य कार्यकर्त्यांची उमेदवारी निश्चित नसली तरी राजकीय घराण्याची दुसरी पिढी आखाड्यात उतरण्यासाठी मात्र सज्ज आहे. खासदार-आमदार, माजी आमदारांच्या मुलांची राजकारणातील पहिली एन्ट्री हे यावर्षीच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य असेल. निश्चित केलेल्या मतदारसंघात इच्छुकांनी संपर्क वाढविला आहे. आचारसंहिता जाहीर झाल्याने आता नेत्यांची मुले आखाड्यात दिसतील, असे चित्र आहे. आपल्या वडिलांच्या, आजोबांच्या, बंधूच्या कामाचा प्रभाव पाडण्यासाठी नेत्यांची नवी पिढी सोशल मीडिया, होर्डिंग्जवर झळकत आहेत. कुणी दुष्काळात केलेल्या कामांची माहिती देऊन नागरिकांमध्ये प्रचार करीत आहे तर कुणी येणाऱ्या काळात होणाऱ्या कामांची फलश्रुती कशी असेल, हे सांगत  आहे. 

प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सगळ्याच पक्षातील नेत्यांची पिढी राजकारणातील कामाची चुणूक दाखवतील. त्यामुळे या निवडणुकीत बहुधा घराणेशाहीचा आरोप कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील खासदार-आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी राहिलेल्या नेत्यांचीच मुले राजकारणाचा आखाडा गाजवतील हे अटळ आहे. 
 
किरण गायकवाड, शरण पाटील पाडणार प्रभाव 
खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण, आमदार बसवराज पाटील यांचे पुत्र शरण हे दोन नवीन तरुण चेहरे जिल्हा परिषदेच्या आखाड्यात उतरणार असल्याने जिल्हा परिषदेत पुन्हा उमरग्याचे वजन असेल, अशी शक्यता आहे. त्यापाठोपाठ आमदार मधुकरराव चव्हाण यांचे ज्येष्ठ पुत्र बाबूराव चव्हाण प्रथमच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आखाड्यात उतरणार आहेत. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, कोणते उमेदवार आहे... 
बातम्या आणखी आहेत...