आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मोहोळ (जि. सोलापूर) येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विकास पानसरे यांच्या आत्महत्येप्रकरणी सोलापूर मंडलचे तत्कालिन अधीक्षक अभियंता धनंजय औंढेकर व सोलापूर ग्रामीण विभागाचे तत्कालिन कार्यकारी अभियंता बालाजी डुमणे या अधिकाऱ्यांना उच्चस्तरीय चौकशी अहवालानंतर तत्काळ निलंबित करण्यात आले. याआधी या प्रकरणी दोन लिपिकांना निलंबित करण्यात आले आहे. 

पानसरे यांनी २९ डिसेंबरला आत्महत्या केली होती. औंढेकर व डुमणे यांच्यावर पानसरे यांना त्रास दिल्याबाबत आरोप करण्यात आले होते. अशा प्रकारची फिर्याद दाखल झाल्यानंतर या दाेघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महावितरणने उच्चस्तरीय चौकशी सुरू केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या चौकशी समितीने सोलापूर, मोहोळ येथे जाऊन पानसरे आत्महत्येप्रकरणी दोन दिवस चौकशी केली व अहवाल सादर केला. दरम्यान ही चौकशी सुरू असतानाच प्रशासकीय कामकाजात दोषी आढळून आलेले प्रमुख लिपिक राम गायकवाड व लिपिक सोमनाथ राठोड यांना दोन दिवसांपूर्वीच निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर चौकशी समितीने दिलेल्या अहवालातील प्राथमिक निष्कर्षानुसार सोलापूर मंडलचे तत्कालिन अधीक्षक अभियंता धनंजय औंढेकर व सोलापूर ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता बालाजी डुमणे यांना तत्काळ निलंबित करण्याचा महावितरणने निर्णय घेतला व त्यासंबंधीचे आदेश ७ जानेवारीला काढण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...