आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराच्या खून प्रकरणात प्रेयसीसह दोघांना कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफाइल फोटो - Divya Marathi
प्रोफाइल फोटो
लातूर -  प्रियकराशी वाद झाल्यानंतर भाऊ आणि मामेभावाच्या मदतीने विवाहित प्रेयसीने प्रियकराचा खून केल्याच्या प्रकरणात तिघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंगरोड परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या  विवाहित स्त्रीचे नानासाहेब जाधव याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी वाद झाला. त्यानंतर तिने भाऊ योगेश लाड, मामेभाऊ प्रवीण डोंगरे याच्या मदतीने नानासाहेब जाधव याचा गळा आवळून खून केला. हा प्रकार मंगळवारी घडला. मात्र दोन दिवस पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. याप्रकरणी वैद्यकीय अहवाल आल्यानंतर आणि मृताच्या नातेवाइकांनी तक्रार दिल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.