आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबार : पार्टीसाठी मित्राचा खून करून 80 हजारांचा एेवज पळवला, 2 अाराेपी अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत राज - Divya Marathi
मृत राज
नंदुरबार- पार्टीसाठी पैसे मिळवण्यासाठी दाेन अल्पवयीन मुलांनी कट रचून चक्क अापल्याच मित्राचा खून केल्याची घटना नंदुरबारमध्ये उघडकीस अाले अाहे. या प्रकरणी दाेन अल्पवयीन मुलांना पाेलिसांनी ताब्यात घेतले अाहे. राज नंदकिशाेर ठाकरे असे मृत विद्यार्थ्याचे नाव अाहे. चाकूने गळा चिरून त्याच्याच अल्पवयीन मित्राने राजचा खून केला. त्यानंतर त्याच्या खिशातील चावी घेत घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ८० हजाराचा एेवज लांवबला हाेता.
 
डी.आर. हायस्कूलमध्ये नववीत शिकणारा राज (वय १५) हा शुक्रवारी बेपत्ता झाला होता. या प्रकरणी राजचे वडील नंदकिशोर ठाकरे यांनी पाेलिसांत फिर्याद दिली हाेती. त्यानंतर खामगाव रस्त्यावर राजचा मृतदेह आढळला होता. या घटनेनंतर कोकणी समाजाच्या युवकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन करून दोषींना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, पाेलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. घटनेनंतर राजची सायकल शाळेतच होती. त्यामुळे राज शाळेच्या प्रांगणात आला होता, हे सिद्ध झाले होते. त्यानंतर त्याच्या मित्रांकडे विचारपूस केली असता राज स्कूटीवर बसून त्याच्या मित्रांसोबत गेल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी डी.आर. हायस्कूल ते कोकणी हिल दरम्यानच्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेज मागवले.  या फुटेजमध्ये राज एका मोटारसायकलवर ट्रिपल सीट जाताना दिसून आला. ते पाहून पोलिसांनी राज सोबत असलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडे विचारपूस केली. पार्टी करण्याच्या हेतूने दोघांपैकी एकाने राजचा खून केल्याचे तपासात उघड झाले. अल्पवयीन मुलाने राजच्या पाठीत आधी रामपुरी चाकू खुपसला. त्यानंतर गळा चिरून निर्दयीपणे त्याची हत्या केली. तसेच राजच्या खिशातून चावी काढली. त्यानंतर दोघे राजच्या घरात शिरले. त्यानंतर कपाट उघडून कपाटातील ७१ हजारांचा सोन्याचा हार तसेच पाच हजार ५०० रुपये चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. 
 
अाराेपींना पश्चात्ताप नाही 
घटनेनंतर मारेकरी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या चेहऱ्यावर कुठलाच पश्चात्तापाचा भाव दिसत नव्हता. खून व चोरी करून तो समाजात बिनधास्त वावरत होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळाले नसते तर पोलिसांना आरोपी हुडकून काढणे अधिक कठीण गेले असते. आरोपीला बारा तासांत शोधून काढल्याने पोलिसांच्या विरोधात असलेला क्षोभ कमी होऊन त्यांचे कौतुक होत आहे.
बातम्या आणखी आहेत...