आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी : तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून निर्घुणरीत्या खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
परभणी - पूर्णा शहरातील सिद्दार्थनगर भागातील एका तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून निर्घुणरीत्या खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि.३०) घडली. याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
 
पवन निवृत्ती भदर्गे असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पंचशिला निवृत्ती भदर्गे यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सिद्धार्थ नगरातीलच मधुकर शिवराम मुळे उर्फ भद्या याने पवन निवृत्ती भदर्गे (वय२३) याच्याशी मंगळवारी सकाळी नऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान आपल्या विरोधात तक्रार का केली, या कारणावरून वाद घातला. त्यातूनच त्याने सिद्धार्थनगरातील श्री निबाणे यांच्या वाड्यात पवन भदर्गेला मारहाण केली. त्याने एका तीक्ष्ण हत्याराने गळा चिरल्यामुळे पवनचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्यावरून मधुकर मुळे याच्याविरुद्ध पूर्णा पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी ए.जी.खान यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक अजयकुमार पांडे अधिक तपास करीत आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...