आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासूच्या हत्येप्रकरणी जावयाला जन्मठेप, माजलगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव- पत्नीला नांदावयास पाठवत नसल्याने सासूची खंजिराने हत्या करणाऱ्या जावयाला गुरुवारी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. व्ही. मोराळे यांनी दोषी ठरवत जन्मठेप व दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. शिवाजी निवृत्ती वाघ (रा. हारकी लिमगाव) असे दोषीचे नाव आहे.
    
शिवाजी निवृत्ती वाघ पत्नी राणीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे माहेरचे लोक तिला सासरी नांदावयास पाठवत नव्हते. १२ डिसेंबर २०१५  रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी हा गावातील  सासुरवाडीत गेला. त्याने सासू अनिता यांना पत्नीला सासरी का पाठवत नाहीत, असा जाब विचारून त्यांच्या पोटात खंजीर खुपसून हत्या केली. या वेळी पत्नी राणीच्याही पोटावर व हातावर वार केले. पत्नी गंभीर जखमी झाली, तर सासू अनिता यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रामभाऊ केरबा कोल्हे यांनी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी तपास करून गुन्ह्याचे दोषारोप पत्र येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाखल केले होते.
बातम्या आणखी आहेत...