आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीयत मध्ये हस्तक्षेप खपवून घेणार नाही; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचा ठराव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- शरीयत कायद्यावर मुस्लिमांचा विश्वास असून ट्रिपल तलाक हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे शरीयत कायद्यात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही, असा ठराव शुक्रवारी (दि.२०) येथे झालेल्या मराठवाडा विभागीय सामाजिक सुधार परिषदेत एकमताने पारित केला. 

 मुन्सीफ इन्साफ कौन्सिलच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी येथील ईदगाह मैदानावर मराठवाडास्तरीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या सामाजिक सुधार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी बोर्डाचे सदस्य अब्दुल रशीद इंजिनिअर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना खलीलूर रेहमान सज्जाद नोमानी, सचिव मौलाना उमरेन महेफुज रहेमानी, कार्यकारी सदस्य डॉ. यासीन उस्मानी बदायू, मौलाना जियाउद्दीन सिद्दिकी (औरंगाबाद), मुफ्ती हसनैन (मालेगाव), डॉ. जावेद मुकरम (औरंगाबाद), मौलाना जुनेद खासगी (हिंगोली), मौलाना रफियोद्दीन अशरफी, मौलाना महेफूज रहेमान फारुकी, मौलाना जहांगीर नदवी, मौलाना गौस खासगी आदींची उपस्थिती होती.   
 
बोर्डाचे प्रवक्ते मौलाना खलीलूर रहेमान म्हणाले, ट्रिपल तलाकचा विषय वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला. त्यामुळे शरीयत कायद्यावर बोट ठेवले जात आहे. समाजाला शरीयत कायद्याची माहिती देण्यासाठी उलेमान जनतेसोबत संपर्क वाढवावा. समाजातील लोकांचे दु:ख ऐकून घ्यावे, मौलवींनी जनतेशी जवळीक साधावी, असे सांगून ट्रिपल तलाक एकाच वेळी देणे मोठा गुन्हा आहे. बहुतांश वेळा शरीयतचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे न्यायालय शरीयतच्या विरोधात गेले असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...