आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलमुळे उलगडले सोनालीच्या खुनाचे रहस्य, प्रशांतने मोबाइल फेकला होता सिंदफणा नदीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - लग्नाअधीच ओढणीने गळा आवळून नववधूचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मोबाइल तरुणाने  सिंदफणा नदीत फेकला. पोलिसांनी चार दिवसांनंतर भोई समाजातील तरुणाच्या मदतीने नदीतील मोबाइल काढल्याने माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील सोनाली नाईकनवरेच्या खुनाला वाचा फुटली आहे. 

सावरगाव येथील सोनाली नाईकनवरे या तरुणीचा  विवाह गावातील प्रशांत खराडे या तरुणाबरोबर  ठरला होता. दीड महिन्यापूर्वी साखरपुडाही झाला हाेता. ९ जानेवारीला सोनाली तिच्या आजीबरोबर माजलगाव येथील रेणुकाई रुग्णालयात डोळे तपासण्यासाठी आली होती. तेव्हा ही संधी हेरून  प्रशांतने सोनालीला दुचाकीवरून नेले होते, असे पोलिस तपासात रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले.  धारूरच्या घाटात प्रशांतने सोनालीचा ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. इकडे सोनालीच्या  वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्रशांत अटक करून खाक्या दाखवताच प्रशांतने पोलिसांना धारूर घाटात नेऊन सोनालीचा मृतदेह दाखवला.   डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवाल राखून ठेवल्याने पोलिसांच्या तपासात अडथळे वाढले होते. 

दरम्यान, शुक्रवारी  पोलिसांनी   प्रशांतला  पुन्हा खाक्या दाखवला. तेव्हा त्याने आपण सोनालीचा मोबाइल त्या दिवशी धारूर  घाटातून माजलगावला परत येताना  सिंदफणा नदीच्या पाण्यात फेकून दिल्याचे सांगितले. 

दरम्यान, शुक्रवारी पोलिसांनी  भोई समाजाच्या  मदतीने   सोनालीचा मोबाइल नदीबाहेर काढला. यावरून प्रशांत खराडे याने खून केल्याचे सिद्ध झाले आहे.
 
दिशाभूल करणाराखराडेचा जबाब
-माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील प्रशांत खराडे याचा जबाब दिशाभूल करणारा अाहे. त्यानेच सोनाली नाईकनवरे हिचा खून केल्याची शक्यता निर्माण होत आहे.
-विकास दांडे, तपास अधिकारी.