आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ. मुं. शिंदे यांना संत नामदेव काव्य पुरस्कार, हिंगोलीत मंगळवारी वितरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - येथील अक्षरगाथा परिवारातर्फे यावर्षीचा संत नामदेव राज्यस्तरीय काव्य पुरस्कार सुप्रसिद्ध कवी तथा अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे यांना दिला जाणार आहे. यासोबतच ‘रंग कवितेचे’ हे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
 
येथील अक्षरगाथा परिवारातर्फे दरवर्षी जगद््गुरू संत तुकाराम बीजेच्या निमित्ताने संत नामदेव राज्यस्तरीय काव्य पुरस्काराचे वितरण केले जाते. यापूर्वी कल्पना दुधाळ यांना त्यांच्या ‘सिझर कर म्हणते माती’ या काव्यसंग्रहाला देण्यात आला होता. त्यासोबत सुप्रसिद्ध कवी अजीम नवाज राही, ‘बारोमास’कार सदानंद देशमुख, ‘निशाणी डावा अंगठा’ पुस्तकाचे लेखक रमेश इंगळे -उत्तरादकर आदींना पुरस्कार देण्यात आला होता.  
 
यावर्षीचा पुरस्कार हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र प्रसिद्ध कवी प्रा. फ. मुं.. शिंदे यांना दिला जाणार आहे. मंगळवारी (ता. १४) या पुरस्काराचे वितरण सायंकाळी सहा वाजता नारायणनगर येथे केले जाणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षणाधिकारी शिवाजी पवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक राहतील.   
 
यानिमित्ताने ‘रंग कवितेचे’ हे कविसंमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. फ. मुं. शिंदे हे राहतील. त्यांच्यासोबत कवी प्रा. ललित अधाने -औरंगाबाद, संतोष नारायणकर -परभणी व शंकर राठोड -मुखेड हे कवी संमेलनात सहभागी होतील. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अक्षरगाथा परिवार व पडोळे सायन्स कोचिंग क्लासेसतर्फे करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...