आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड : सिनेट निवडणुकीत ‘काँग्रेस’ने मारली बाजी; दहापैकी 9 जागा जिंकल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर ही चार जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ   व्यवस्थापन परिषदेच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने दहापैकी नऊ जागा जिंकून एकहाती वर्चस्व मिळवले आहे. अभाविप पुरस्कृत पॅनलला केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले.   

  काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या नेतृत्वाखालील ज्ञानतीर्थ विकास पॅनल व अ.भा.वि.प. पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच पॅनलमध्ये लढत झाली. ज्ञानतीर्थ विकास पॅनलचे ९ जण निवडून आले. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे (कंसात मिळालेली मते) व्हीजेएनटी प्रवर्गातून गजानन अस्वलेकर (विजयी ३६९७) यांनी शिवाजी कोनापुरे यांचा पराभव केला (२५२७), महिला राखीव मीनाक्षी खंदारे (३२५५ कोटा ३०८२) विजयी झाल्या. अश्विनी देशमुख यांना २२२० मते मिळाली. अनुसूचित जमाती प्रवर्गातून परसराम कपाटे (३३०४ कोटा ३१०२), त्यांचे प्रतिस्पर्धी गोविंद अंकुरवाड यांना २२५९ मते मिळाली. इतर मागास प्रवर्गातून बालाजी वैजापूरे (२७३६), त्यांनी  सिद्धेश्वर कासनाळे (२४९५) यांचा पराभव केला. अनुसूचित जातीमधून अजय गायकवाड (२८८१) हे निवडून आले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी प्रल्हाद डोंगरे यांना २००२ मते मिळाली. सर्वसाधारण प्रवर्गातून विक्रम पतंगे, युुवराज पाटील, नारायण चौधरी, महेश मगर हे विजयी झाले आहेत.  
 
पहाटेपर्यंत मतमोजणी 
  विद्यापीठ परिक्षेत्रातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातील ३५ मतदान केंद्रांवर २९ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. यामध्ये ५३.१६ टक्के मतदान झाले होते. याची मतमोजणी ३१ ऑक्टोबर रोजी सुरू झाली होती, ती १ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत विद्यापीठ परिसरात सुरू होती.
 
बातम्या आणखी आहेत...