आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद: दीपकनगर येथे राष्ट्रीय पेयजल योजनेत दहा लाखांचा अपहार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील दीपकनगर येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये बनावट कागदपत्रे तयार करून ९ लाख ५३ हजार १९४ रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्या चौकशीतून समोर आले आहे. याप्रकरणी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्याने ग्रामीण विकास लोकअदालतीमध्ये तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी दोषींवर फाैजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन १० दिवस झाले तरी अद्याप कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.  
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दीपकनगर तांडा येथे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सन २०१४-१६ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत एकूण २६ लाख २९ हजार ९१५ रुपयांच्या रकमेला तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर सदरचे काम करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या खात्यावर ४ लाख ७ हजार रुपयांचा लोकवाटा, शासनाकडून ३० टक्क्यांप्रमाणे ६ लाख ६४ हजार ६२१ पहिला हप्ता व ७ लाख ३६ हजार १३१ रुपयांचा दुसरा हप्ता व बँकेचे व्याज अशी एकूण १४ लाख ५३ हजार ०९४  रुपये इतकी रक्कम समितीच्या खात्यावर जमा होती. समितीचे खाते तत्कालीन सरपंच तथा समितीचे अध्यक्ष संजय धेनू राठोड व सचिव तथा ग्रामसेवक संजय बाबूराव सुर्वे यांच्या संयुक्त खात्यावर जमा होती. परंतु समितीच्या अध्यक्ष व सचिवांनी काम पूर्ण न करताच यापैकी ९ लाख ५३ हजार १९४ रुपये उचलून त्याचा अपहार केल्याचे समोर आले. याप्रकरणी दीपकनगर तांड्याचे माजी सरपंच बाळासाहेब लोभा राठोड व ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र रामचंद्र राठोड यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून करण्यात आलेल्या चौकशीत ही गंभीर बाब समोर आली. याबाबतचा अहवाल समोर आल्यानंतर दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी वरील दोघांनी हे प्रकरण ग्रामविकास लोकअदालतीमध्ये मांडले होते. 
बातम्या आणखी आहेत...