आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅडमिट होण्याचा फॉर्म भरण्यास नकार देत मद्यधुंद कक्ष सेवकाची रुग्णाला शिवीगाळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- गंभीर रुग्णास मध्यरात्री डॉक्टरांनी तपासणी करून दाखल होण्यास सांगितले. त्या वेळी रुग्ण व नातेवाइक दाखल होण्यास फॉर्म भरण्यासाठी गेले असता मद्यधुंद कक्ष सेवकाने फॉर्म भरण्यास नकार देऊन शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडला. रुग्णाच्या तक्रारीनंतर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गलांडे यांनी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची टिप्पणी केली असून कर्मचाऱ्याला ड्यूटीवर रुजू करून घेतले नाही. मात्र, कर्मचारी मद्यपान करून रुग्णालयात ठाण मांडून आहे.   


जिल्हा रुग्णालय सतत कोणत्या ना कोत्या कारणाने चर्चेत असते. बुधवारी (दि.२२) सायंकाळी एक रुग्णाने डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली. त्या वेळी डॉक्टरांनी रुग्णाला दाखल होण्यास सांगितले. त्याप्रमाणे रुग्ण व नातेवाइक दाखल होण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी कक्ष सेवक फुटाणे यांच्याकडे आले. त्या वेळी फुटाणे दारूच्या नशेत होते. त्या वेळी रुग्णाने दाखल होण्यासाठी फॉर्म भरावयाचा असल्याचे सांगितले. मात्र, फुटाणे यांनी रुग्ण व नातेवाइकाला शिवीगाळ करत मी फॉर्म भरत नसल्याचे सांगितले. रुग्णालयातच शिव्या देण्याचा सपाटा सुरू केला. रुग्ण व नातेवाइकाने संबंधित कर्मचाऱ्यांबाबत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गलांडे यांच्याकडे तक्रार केली. डॉ. गलांडे यांनीही फुटाणे याला समज दिली, मात्र सतत मद्यधुंद अवस्थेत राहत असलेल्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात यावे अशी टिप्पणी तक्रार अर्जावर करून अर्ज वरिष्ठांकडे पाठवला. ३ वर्षांत काही वैद्यकीय अधिकारी मद्यपान केलेल्या अवस्थेत आढळून आले होते. काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दारूच्या नशेत रुग्णाला व नातेवाइकांना शिवीगाळ केल्याचे प्रकारही घडले होते. या घटना ताज्या असतानाच कक्ष सेवकानेही ऑन ड्यूटी मद्यप्राशन करून रुग्ण व नातेवाइकांना शिवीगाळ करण्याचा प्रकार धक्कादायक आहे. 

 

रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाची गरज   
जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी दारूसह विविध व्यसनाने बरबटलेले आहेत. याची कल्पना व सतत तक्रारीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेल्या आहेत. कल्पना असतानाही वरिष्ठ अधिकारी दारुड्या व व्यसनी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करत नाहीत. तसेच मद्यपान करणाऱ्यांसह इतर व्यसन जडलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कोणत्याही कारवाई केल्याचे दिसून आले नाही.   

 

 

आरोग्य विभागाला व्यसनांची ‘कीड’   
आरोग्य विभागातील काही वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी व्यसनाधीन आहेत. दारू, तंबाखू, बिडी-सिगारेट अशी व्यसने आहेत. सुपारी खाणारे अधिकारी, कर्मचारी असल्याची साक्ष तर जिल्हा रुग्णालयाच्या भिंतीवरील पिचकाऱ्या व रंगलेले कोपरे देत आहेत. मात्र, अशा व्यसनी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कोणतीच कारवाई होत नाही. यामुळे सामान्य रुग्णांना त्रास होत आहे.   

 

 

उस्मानाबादचे जिल्हा रुग्णालय सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत

यापूर्वी अॅम्ब्युलन्सचाही केला गैरवापर? : रमेश फुटाणे दोन वर्षांपूर्वी तेर येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत होता. त्या वेळी त्याची रात्री ९ ते १० वाजेपर्यंत ड्यूटी होती. त्यानंतर उस्मानाबादला परतण्यासाठी त्याला वाहन नसल्यामुळे छातीत दुखत असल्याचा बहाना करून ग्रामीण रुग्णालयातील अॅम्ब्युलन्सने जिल्हा रुग्णालयात येऊन घरी गेल्याचा प्रकार घडल्याचे कळते.   

 

निलंबनासाठी अर्ज पाठवला   
रुग्ण व नातेवाइकाने दिलेल्या तक्रार अर्जावर कक्षसेवक रमेश फुटाणे यास निलंबित करण्यात यावे अशी टिप्पणी करून अर्ज वरिष्ठांकडे पाठवला आहे. यापूर्वीही अनेक वेळा फुटाणे याने ऑन ड्यूटीवर असताना मद्यप्राशन केले होते. घटनेनंतर त्याला रुजूही करून घेतले नाही. वेळोवेळी सूचना देऊनही बदल होत नसल्याचे दिसत आहे.  
- डॉ. गलांडे, निवासी वैद्यकीय अधिकारी.

 

बातम्या आणखी आहेत...