आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबाजोगाई शहरात पाच पालख्यांचा एकत्र रिंगण सोहळा, खेळांनी डोळ्याचे पारणे फिटलेे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - ज्ञानोबा तुकोबाचा टिपेला पोहाेचलेला जयघोष, पाच पालख्यांमधील हजारो वारकरी, टाळमृदंगाचा गजर आणि रिंगणात अश्व धावताना अंगावर उभे राहिलेले रोमांच अशा भावभक्तीच्या वातावरणात हजारो अंबाजोगाईकरांनी रविवारी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात रिंगण सोहळा अनुभला.

विठ्ठलभेटीसाठी जाणाऱ्या पालख्यांचे एकत्रित रिंगण करण्याच्या पद्धतीला पाच वर्षांपासून अंबाजोगाईत सुरुवात झाली आहे. नरसी नामदेव (जि. हिंगोली) यांची पालखी, तिरुपती बालाजी दिंडी आकोट, यांची पालखी, कोंडूर (जि. हिंगोली) येथील संत विठोबा बाबा, गणोरी (जि. अमरावती) येथील महमंद खान महाराज यांची पालखी तर अकोला येथील भाऊसागर माऊली यांची पालखी शहरात दाखल झाली. योगेश्वरी मैदानात बँड पथक व फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. ध्वजारोहण, पालखी पूजन व अश्वपूजेनंतर रिंगण सोहळा सुरू झाला. सजवलेला अश्व, भगवी पताका हाती घेतलेले वारकरी लक्ष वेधून घेत होते. संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवलेला देखावाही सादर करण्यात आला हाेता. रिंगण सोहळ्याच्या निमिताने गायक सुभाष शेप व त्यांच्या सहकाऱ्यांनी अभंगवाणी हा भक्ती संगीताचा कार्यक्रम सादर केला. विठ्ठलनामाच्या जयघोषात उत्साही वातावरणात रिंगण सोहळा पार पडला. सोहळ्याचे स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, दिलीप सांगळे, अंकुशराव काळदाते, प्रकाश बोरगावकर, सुधाकर महाराज शिंदे, मारुतीराव रेड्डी, ह.भ.प. बाबामहाराज जवळगावकर, ह.भ.प.,पं उद्धवराव आपेगावकर, जयकुमार लोढा, डॉ. नरेंद्र काळे, श्रीरंग सुरवसे, नूर पटेल, बळीराम चोपणे, वैजिनाथ देशमुख, अनिकेत देशपांडे, दिलीप गित्ते, अनंत आरसुडे, विनोद मुंदडा, शंकर उबाळे, सुनील मुथ्था यांची उपस्थिती होती.

यंदाही गुरू-शिष्य भेट अधुरीच
गंगाखेडच्या संत जनाबाईंचे गुरू नामदेव महाराजांच्या पालखीचे गेल्या चौदा वर्षांपासून अंबाजोगाईत मिलन होत होते. परंतु गेल्या वर्षीही दोन अमावास्या आल्याने भेट झाली नव्हती. यावर्षी भेट झाली नाही.
बातम्या आणखी आहेत...