आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या गडाला खिंडार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - जिल्हा परिषदेत वर्चस्व कायम राखलेल्या काँग्रेसला पंचायत समितीमध्ये मोठे खिंडार पडले आहे. मागील वेळी जिल्ह्यातील १६ पंचायत समित्यांपैकी माहूर व उमरी वगळता सर्वच तालुक्यांवर काँग्रेसचे वर्चस्व होते.
 
मात्र, या वेळी भाजपने जोरदार मुसंडी मारत पाच पंचायत समित्यांवर बहुमत मिळवले  आहे. काँग्रेसला केवळ आठ तालुक्यांतील सत्ता कायम राखता आली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येकी एक व नायगावमध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने तेथे त्रिशंकू अशी अवस्था आहे.  

नांदेडसह १६ तालुके असलेला नांदेड जिल्हा हा मराठवाड्यात सर्वात मोठा जिल्हा आहे. येथे सुरुवातीपासूनच काँग्रेसचे वर्चस्व आहे. नांदेड व चव्हाण यांचे अतूट नाते आहे. हे नाते शंकरराव चव्हाणांपासून आहे. ते अशोक चव्हाण यांनीही कायम राखले आहे.
 
माजी मुख्यमंत्री असलेले खासदार अशोक चव्हाण हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही आहेत. त्यांना पक्षकार्यासाठी राज्यात लक्ष द्यावे लागत असले तरी त्यांचे नांदेडवरही विशेष लक्ष असते. 

नगरपालिका निवडणुका असोत की, जिल्हा परिषदेच्या राज्यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने नांदेड जिल्हा परिषदेत ६३ पैकी २८ जागा जिंकून वर्चस्व कायम राखले आहे.
 
असे असले तरी काँग्रेसच्या जवळपास सहा पंचायत समित्यांमधील सत्तेला खिंडार पाडून तेथे भाजपने बहुमत मिळवले आहे. नांदेडसह अर्धापूर, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, माहूर, देगलूर व हदगाव या आठ पंचायत समित्यांमधील सत्ता काँग्रेसला कायम राखता आली आहे.  
 
 
अन्य आठ पंचायत समित्यांमध्ये पाच पंचायत समित्यांवर विजय मिळवून भाजपने दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. राष्ट्रवादीने उमरी व शिवसेनेने लोहा या तालुक्यांवरील सत्ता मिळवली आहे, तर नायगाव पंचायत समितीमध्ये कुणालाच बहुमत नाही.
 
तेथे काँग्रेस चार जागा जिंकून पहिल्या स्थानावर आहे, भाजप तीन व राष्ट्रवादी एक असे पक्षीय बलाबल आहे. तेथे सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसला राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...