आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनुष्याने विनयशीलता अंगीकारावी : प्रसन्नसागरजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - मानवाने जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर त्यासाठी स्वत: नम्र व विनयशील बनले पाहिजे, तरच ख-या अर्थाने तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. तसेच जीवनात सुखी राहू शकाल; पण त्यासाठी तुम्हाला विनयशीलतेचीच कास धरून मार्गक्रमण करावे लागेल, असे प्रतिपादन अंतर्मना मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराज यांनी केले. पैठण येथील अयोध्यानगरमध्ये १९ एप्रिलपासून सुरू असलेल्या पंचकल्याणक प्राणप्रतिष्ठा महोत्सवादरम्यान ते बुधवारी (२२ एप्रिल) बोलत होते.

पैठण येथे रविवार (१९ एप्रिल) पासून अंतर्मना मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराज व पीयूषसागरजी महाराज यांच्या परम पावन सान्निध्यात सुरू असलेल्या पंचकल्याणक महोत्सवाच्या चौथ्या दिवशीही हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते म्हणाले की, मुलांना शाळेत शिक्षणाबरोबर संस्काराचेही धडे मिळायला हवेत. तसेच विद्यार्थ्यांनीही ज्ञानाबरोबर संस्कारही आत्मसात करावे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर प्रत्येकाने तीन गोष्टी लक्षात ठेवा. त्या म्हणजे थोडे झुकणे, ऐकणे आणि सहनशीलता बाळगा. या तीन गोष्टी ज्याने अंगीकारल्या तो खरच आपले ध्येय सहज गाठू शकतो. तसेच आपल्या जीवनात परिवर्तन होईल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पैठण सकल जैन समाजासह क्षेत्राचे अध्यक्ष महावीर बडजाते, महामंत्री विलास पहाडे, कोशाध्यक्ष पन्नालाल पापडीवाल, विश्वस्त प्रमोद कासलीवाल, जयकुमार बाकलीवाल, रायचंद भूस, मनोज काला, कपील पहाडे, स्वदेश पांडे, अल्केश कासलीवाल, आनंद सिंघवी, नरेंद्र अजमेरा व पीयूष कासलीवाल परिश्रम घेत आहेत.

पैठण शहरात विविध वास्तूंचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
मिश्रीलाल पहाडे जैन इंग्लिश स्कूलच्या इमारतीचे उद््घाटन मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराज व पीयूषसागरजी महाराज यांच्या सान्निध्यात जयपूर येथील नेमिचंद ठोलिया, तर श्रीमती सूरजबाई पूनमचंद बाकलीवाल अतिथी भवनाचे अशोक व पारसकुमार चुडीवाल व ठोलिया यांच्या हस्ते करण्यात आले.