आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहेरच्या ग्रंथदिंडीत ग्रामविकासमंत्री मुंडे रमल्या, मानपान न घेता डोक्यावर घेतले तुळशी वृंदावन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी- टाळ-मृदंगाचा गजर, ग्यानबा-तुकारामच्या जयघोषात राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी माहेर असलेल्या नाथ्रा गावातील अखंड हरिनाम सप्ताह सांगतेच्या दिंडीत फुगडीचा आनंद घेतला. पंकजा मुंडे आल्याने ग्रामस्थांतही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
   
परळी तालुक्यातील नाथ्रा येथे  शनिवारी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. काल्याच्या कीर्तनाच्या अाधी गावात ग्रंथदिंडी काढण्यात आली. माहेरात आज हरिनाम सप्ताहाची सांगता असल्याचे पंकजा यांना कळताच त्यांनी सकाळी माहेर गाठले. मंत्रिपदाचा मानपान बाजूला ठेवून गावातील एका सामान्य माहेरवाशिणीप्रमाणे  पंकजा मुंडे दिंडीत गळ्यात टाळ आणि  डोक्यावर तुळशी वृंदावन घेत सहभागी झाल्या. अभंगाच्या तालावर त्या दिंडीत चांगल्याच रमल्या.
दिंडीतील महिलांबरोबर त्यांनी फुगडीही खेळली. गावात पंकजा मुंडे यांना दिंडीत सहभागी झाल्याचे पाहताच वृद्ध महिलांनी कौतुक केले. मंत्री असूनही पंकजा दिंडीत सहभागी झाल्याने वृद्ध महिला पाठीवर थाप  टाकत  होत्या. या ग्रंथदिंडीत सुखदेव  मुंडे, दिनकरराव मुंडे, रामेश्वर मुंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होेते.
बातम्या आणखी आहेत...