आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी: गँगमनच्या सतर्कतेने टळला रेल्वेचा अपघात; अज्ञात व्यक्तीने काढल्या रुळाच्या पिना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी- परळी-मलकापूर या हैदराबादकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी रात्री २ वाजता शिर्डी एक्स्प्रेस निघून गेल्यानंतर अज्ञात व्यक्तीने रुळाच्या पिना काढल्या. शुक्रवारी मिरजहून सकाळी परळीला रेल्वे येण्यापूर्वी गँगमनने रुळांची पाहणी केली तेव्हा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने पिना बसवल्याने संभाव्य अपघात टळला.

अंशुमन कुमार ठरले हीरो...
स्टेशनपासून ३ किमी अंतरावर परळी-मलकापूर मार्गावर १२० नंबरचे  रेल्वे गेट असून गुरुवारी पहाटे २ ते ५ यावेळेत अज्ञात व्यक्तीने हातोडी व रॉडने रुळांच्या पिना काढल्या. मिरजहून साडेसहा वाजता रेल्वे येणार असल्याने सकाळी रुळांची तपासणी करण्यासाठी अंशुमन कुमार आले तेव्हा त्यांना पाच पिना निघाल्याचे व अन्य पाच पिना ढिल्या झाल्याचे लक्षात अाले. त्यांनी तातडीने वरिष्ठांना कळवले व १० पिना बसवल्या. 
बातम्या आणखी आहेत...