आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटनांद्रा: पीठाधीश जबलपूरकर स्वामी यांना अखेरचा निरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घाटनांद्रा  - येथून जवळच असलेल्या  डोंगरनिवासिनी श्री इंद्रगढी देवीच्या संस्थानाचे  पीठाधीश परमपूज्य श्री  जबलपूरकर स्वामी यांचे  अल्पशा आजाराने गडावर  मंगळवारी सायंकाळी देहावसान झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांचा समाधी सोहळा  परिसरात शिष्यगणांच्या उपस्थितीत बुधवारी शोकाकुल वातावरणात व ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषामध्ये दुपारी बारा वाजता करण्यात आला.  या वेळी परिसरातील  शिष्यगणांची उपस्थिती होती.  

श्री  जबलपूरकर स्वामी यांचा जन्म पन्हाळगढ ऊर्फ पढरिया  येथे १२ ऑगस्ट १९३६ रोजी झाला. त्यांचे नाव दिनेशधर छोटेलाल दुबे  ऊर्फ बडगैया असे होते. परंतु त्यांचे बालपण हे जबलपूर या ठिकाणी गेल्याने त्यांचे नाव जबलपूरकर स्वामी असे पडले. ते विवाहित असून त्यांना तीन मुले व सात  मुली  आहेत. पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले.  संसारात त्यांचे  मन लागत नसल्याने त्यांनी संसाराचा त्याग करून  सन  १९७८ -७९ मध्ये  महाराष्ट्रात आले. या ठिकाणी  आल्यावर प्रथम त्यांची  महात्मा गजानन गिरी यांच्याशी  भेट झाली. प्रथम  त्यांनी स्वामींना सिसारखेडा येथील देवीच्या मंदिरात राहण्यास सांगितले. त्या ठिकाणी काही  दिवस राहून पळशी धानोरा  या ठिकाणी असलेल्या मंदिरात त्यांनी काही दिवस काढले.  तिथे  त्यांचे मन  लागले नाही. घाटनांद्रा येथील सागमाळ शिवारात व   निसर्गाच्या सान्निध्यात श्री  इंद्रगढी देवीचे मंदिर असल्याचे माहीत झाले.  १९९५ मध्ये इंद्रगढी देवीच्या दरबारात आपले पहिले पाऊल ठेवल्यावर   त्यांचे  मन  रमले.   

  त्यांच्या समाधी सोहळ्याप्रसंगी  ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात सर्व विधी रीतसर पार पडल्यावर उपस्थित भाविकांनी स्वामीजींचे अंत्यदर्शन घेतले. श्रीराम जय राम जय जय राम , राजा राम राम राम   सीता राम राम राम राम, हर हर महादेव  या मंत्राचा जप करत  हारफुलांनी सजवलेल्या डोलीमध्ये बाबाजींची अंत्ययात्रा  परिसरात टाळ-मृंदगाच्या  गजरात  काढण्यात आली.
 
बाबाजींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिष्यगणांच्या उपस्थितीने परिसर फुलून गेला होता.  त्यानंतर  बाबाजींचे  पार्थिव  फुलांनी सजवलेल्या  समाधिस्थळाकडे आणण्यात आले.  या ठिकाणी आल्यावर  महाराजांवर ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात व  साधुसंतांच्या हस्ते  समाधी संस्कार करण्यात आले.   
 
याप्रसंगी  आमदार अब्दुल सत्तार, सुनील मिरकर, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे  यांची  श्रद्धांजलिपर भाषणे झाली.  या बालयोगी काशीगिरी महाराज, भोले महाराज,  शेलगावचे  दयानंद महाराज, राजेंद्रभय्या जैस्वाल, नामदेवराव चापे,  सुरेश बनकर,  कमलेश कटारिया, त्र्यंबक काकडे, माणिक महाराज, नारायण महाराज, काकडे महाराज व शिष्यगण उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...