आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार अपघातात पोलिस दांपत्य ठार, जखमी मुलांना नगरला पाठवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत संदीप तागड - Divya Marathi
मृत संदीप तागड
आष्टी - जामखेडहून नगरकडे निघालेली कार वाटेत उभ्या असलेल्या कंटनेरवर पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात पोलिस दांपत्य ठार झाले. हा अपघात आष्टी तालुक्यातील वटणवाडीजवळील पेट्रोल पंपासमोर सोमवारी सकाळी साडेदहा वाजता घडला. संदीप गोपीनाथ तागड (४२), पत्नी सुलभा (३५) अशी मृतांची नावे असून त्यांची दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत.  

अहमदनगर जिल्ह्यातील तागडवस्ती येथील रहिवासी असलेले संदीप गोपीनाथ तागड जामखेड पोलिस ठाण्यात विशेष शाखेत  पोलिस नाईक  म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी  संदीप तागड हे पत्नी सुलभा, मुलगी स्नेहा (१३), मुलगा साई  (१०) हे कुटुंबीय अहमदनगरकडे  कारने निघाले होते. त्यांची कार वटणवाडी शिवारातील पेट्रोल पंपासमोर आली तेव्हा रस्त्याच्या खाली उभ्या असलेल्या कंटेनरवर  पाठीमागून जोरात आदळली.  या अपघातात स्वत: चालक असलेले पोलिस नाईक संदीप तागड, सुलभा यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा साई आणि मुलगी स्नेहा गंभीर जखमी झाले.  या अपघाताचे वृत्त समजताच पेट्रोल पंपावरील कामगारांनी आष्टी पोलिसांना  माहिती दिली. यानंतर पोलिसांनी अपघातस्थळी  भेट देऊन पाहणी केली.   

जखमी मुलांना नगरला पाठवले   : वटणवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप खाकाळ, पप्पू खाकाळ यांनी दोन्ही मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. अपघातातील  दोन्ही  मुलांना अहमदनगर येथे उपचारासाठी  दाखल करण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...