आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीडित शाळकरी मुलीने दिला बाळास जन्म, दहावीतल्या विद्यार्थ्याने केला होता बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
अंबड  - बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या आठवीतील मुलीने बाळाला जन्म दिला. सदर अल्पवयीन मुलगी तालुक्यातील चिंचखेड येथील शाळेत शिकत आहे. जून २०१६ मध्ये शाळेतीलच दहावीच्या विद्यार्थ्याने धाक दाखवून अत्याचार केल्याची तक्रार संबंधित मुलीने पोलिस ठाण्यात दिली.  

या मुलीने १ फेब्रुवारी २०१७ रोजी औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी दवाखान्यातून सुटी झाल्यानंतर तिने आजोबांना सोबत घेऊन मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार सोमवारी अंबड पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. यात तिने म्हटले आहे की, जून २०१६ मध्ये शाळेच्या मधल्या सुटीच्या वेळेत स्वच्छतागृहातून परत येताना शाळेतीलच दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वच्छतागृहाचा दरवाजा आतून बंद केला व मारहाण करीत बदनामी करण्याची धमकी देत बलात्कार केला. यानंतर चार ते पाच महिन्यांनंतर तिच्या शरीरातील बदल लक्षात येताच आजीने तिच्याकडे चौकशी केली. तेव्हा तिने या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीची औरंगाबाद येथील एका रुग्णालयात तपासणी करण्यात आली तेव्हा डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले. दरम्यान, १ फेब्रुवारी रोजी तिने बाळाला जन्म दिल्यानंतर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सोमवारी अंबड पोलिस ठाण्यात वर्ग झाला असून पुढील तपास पो. नि. रामेश्वर खनाळ करीत आहेत.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...