आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभाविपचे 11 तास अांदाेलन; प्राचार्यांच्या टेबलावर दगड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील जवाहर फाउंडेशनच्या मेडिकल काॅलेजमधील ७५ विद्यार्थ्यांना विषबाधा हाेऊनही त्याची दखल घेण्यात न अाल्यामुळे संतप्त झालेल्या  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी  मंगळवारी रात्री १० वाजेपासून सुरू केलेले धरणे अांदाेलन बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तब्बल १३ तास चालले. त्यानंतरही दखल घेतली नाही, म्हणून चिडलेल्या कार्यकर्त्यांनी अखेर प्राचार्यांच्या दालनातच भलामाेठा दगड अाणून ठेवला. यानंतर पुन्हा वादाला सुरुवात झाली. अभाविपविरुद्ध मेडिकल काॅलेजचे विद्यार्थी समाेरासमाेर अाले. यात अभाविपच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्कीही झाली. पाेलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे माेठी घटना टळली.  

शहराजवळील माेराणे हद्दीतील जवाहर फाउंडेशनच्या एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संस्थेच्या मेसमधील जेवणातून विषबाधा झाली. साेमवारी रात्री विद्यार्थ्यांनी हे जेवण घेतले. एेन परीक्षेच्या कालावधीत हा प्रकार घडला. संस्थेने प्रकरण दडपण्याचे भरपूर प्रयत्न केले. मात्र, विद्यार्थी संघटनांनी यावर अावाज उठवला.  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मंगळवारी रात्रीपासून महाविद्यालयाच्या परिसरात धरणे आंदोलन सुरू केले होते. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. संतप्त अभाविप कार्यकर्त्यांनी बुधवारी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना घेराव घालून जाब विचारला. या वेळी महाविद्यालयातील कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीची व अवहेलनात्मक बाबीची चौकशी करण्याची मागणी विद्यार्थी परिषद कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, दुसरीकडे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विषबाधा झाल्याचे मान्य करीत या प्रकरणी चाैकशी समिती नियुक्त करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची माहिती दिली.  दिवसभरात प्रशासकीय यंत्रणेने महाविद्यालयात भेट देऊन अन्न, पाण्याचे नमुने घेतले.

८ विद्यार्थ्यांचे शौच नमुने
विषबाधेचे नेमके कारण समजावे यासाठी आठ विद्यार्थ्यांचे शौच नमुने घेण्यात आले. या नमुन्यांची पडताळणी करून नेमके कारण समजणार आहे. तसेच काही विद्यार्थ्यांची युरिन टेस्ट करण्यात आली आहे. तर आरोग्य विभागातर्फे पाण्याचे नमुने घेण्यात आले. अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्नाचे नमुने घेण्यात आले आहेत.
 
प्राचार्यांनी दिली उपचाराची कबुली
-मंगळवारी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्रास होत असल्यामुळे विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले. त्यात ४९ विद्यार्थी व ३६ विद्यार्थिनींवर उपचार करून सोडण्यात आले, तर ८ विद्यार्थिनींना अॅडमिट करण्यात आले होते. तसेच एका विद्यार्थ्याला आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. सर्वांची प्रकृती चांगली आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे.

प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील, एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालय