आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे विस्ताराला विरोध, लातूरकरांची निदर्शने; 116 टक्के नफा देणाऱ्या रेल्वेचा विस्तार का केला?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- मुंबई-लातूर ही रेल्वे बिदरपर्यंत सोडण्याच्या निर्णयाला लातूरमधून मोठा विरोध होत असून बुधवारी सकाळी रेल्वेस्थानकावर डीआरएम अजय दुबे यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली. गुरुवारी रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

मुंबई-लातूर ही एक्स्प्रेस दिवसभर लातूर स्थानकावर थांबून राहते. लोकांच्या सोयीसाठी ही रेल्वे दिवसभराच्या काळात पुण्यापर्यंत सोडण्याची मागणी केली जात होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून रेल्वे प्रशासनाने ही गाडी बिदरपर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे लातूर रेल्वे स्थानकावरून निघणाऱ्या या १२०० प्रवासी क्षमतेच्या गाडीची तिकीट विक्री सरासरी २००० एवढी होते. रेल्वे अधिकाऱ्यांच्याच म्हणण्यानुसार ही गाडी ११६ टक्के फायद्यात चालणारी आहे. तरीही ही गाडी बिदरपर्यंत नेण्याचा घाट घालण्यात आला. या विस्तारामुळे बिदर, भालकी, उदगीरच्या प्रवाशांचा कोटा वाढणार असून लातूर-उस्मानाबादच्या प्रवाशांना तिकिटेच मिळणार नाहीत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही गाडी विस्तारित होऊ नये यासाठी बुधवारी सकाळी लातूर रेल्वेस्थानकावर नागरिकांनी निदर्शने केली. त्याचबरोबर आणखी मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.  
 
शनिवारी अंादोलन
लातूर- मुंबई रेल्वे बिदरपर्यंत विस्तारीत करण्यात आल्याने त्याच्या निषेधार्थ लातूर एक्सप्रेस बचाव कृती समितीच्यावतीने २९ एप्रिल रोजी लातुरातील गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. लोकांत जागृती आण्ण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
 
भावना कळवणार  
खासदारांचे एक शिष्टमंडळ योगायोगाने लातूरच्या स्थानकावर येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी सोलापूर विभागाचे डीआरएम अजय दुबेही उपस्थित होते. त्यांना संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. दुबे यांनी लोकांच्या भावना ऐकून घेऊन त्या वरिष्ठांना कळवू आणि बिदरसाठी नवी गाडी सुरू करता येते काय? याची चाचपणी करू, असे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...