आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे, कुलाबा वेधशाळा अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार; पावसाचा खोटा अंदाज हवामान खात्याने वर्तवला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
माजलगाव  - पुणे व कुलाबा वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी खते, बी-बियाणे फवारणी, औषधे  निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संगनमत करून जून २०१७ मध्ये चांगला पाऊस पडणार असा खोटा अंदाज दिला. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याचा आरोप करून वेधशाळांच्या अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार शेतकरी संघर्ष  समितीचे अध्यक्ष गंगाभीषण थावरे यांनी  दिंद्रुड पोलिस ठाण्यात दिली आहे. हवामान खात्यावर विश्वास ठेवून आपल्यासह इतर शेतकऱ्यांनी केलेली पेरणी वाया गेली व भुर्दंड बसला, असे तक्रारीत नमूद आहे. 
 
कारवाई करावी
पुणे व कुलाबा वेधशाळेचे अधिकारी व त्यांच्याशी संगनमत केलेले राज्यातील खते, बी- बियाण्यांच्या कंपन्यांचे अधिकारी यांची चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व कायदेशीर कारवाई करावी, अशा तक्रारीची प्रत थावरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी यांना पाठवली आहे.
बातम्या आणखी आहेत...